रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला चांगला दर मिळावा यासाठीची मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहेत. यानंतर याच मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरातील टी पॉइंटवर काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर दूध ओतून यावेळी सरकारचा निषेध करत महामार्ग रोखून धरला.
राज्यात आतापर्यंत दूध दर (Milk Price) वाढीच्या मागणीसाठी शेतकरी, शेतकरी संघटना तसेच राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात आले आहेत. यानंतर दूध दरवाढीच्या मागणीसाठी काँग्रेस (Congress) आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा; यासाठी फुलंब्रीमध्ये काँग्रेस आक्रमक झाले आहे. सरकारने दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधाला सरसकट ४० रुपये भाव तर म्हशीच्या दुधाला ७० रुपये भाव द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
दूध ओतून केला निषेध व्यक्त
दरम्यान फुलंब्री येथे काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी (Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्ग रोखून धरला. तर सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दूध ओतून निषेध करण्यात आला. दरम्यान यावेळी छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती आणि वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.