पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

सतत चर्चेत असलेल्या बीडशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आलंय.. पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केलीय.. मात्र ही खरंच आत्महत्या आहे की हत्या? पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या नातेवाईकांनी नेमके काय आरोप केलेत? पाहूयात.
Anant Garje Wife Gauri Palwe:
GAURI GARJE DEATH MYSTERY: SUICIDE OR MURDER? FAMILY ACCUSES FOUL PLAYsaam tv
Published On

हा टाहो फोडलाय पंकजा मुंडेंच्या पीएची पत्नी गौरीच्या आई-वडीलांनी. पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेच्या पत्नीनं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

खरंतर 2 फेब्रुवारी 2025 ला डेन्टीस्ट डॉ. गौरी पालवे आणि पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेचं लग्न झालं. गौरी ही नायर हॉस्पिटलमध्ये डेंटीस्ट म्हणून काम करायची. मात्र अनंतकडून गौरीचा सातत्यानं छळ केला जात असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. तर सप्टेंबरमध्ये घर शिफ्ट करताना गौरीला घरात अनंतच्या अफेअरची काही कागदपत्रं सापडली.

Anant Garje Wife Gauri Palwe:
Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

तिथूनच अनंतविषयी गौरीच्या मनात संशय बळावत गेला आणि त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा दावा कऱण्यात आलाय. मात्र घटनेपुर्वी नेमकं काय घडलं? पाहूयात. गौरीच्या आत्महत्येवेळी मी घरी नव्हतो. घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळं 29 व्या मजल्यावरच्या रिफ्युजी एरियातील इन्हिजिबल जाळी उचकटून आपण 30 व्या मजल्यावर गेलो. तेव्हा गौरीने गळफास घेतला होता. तिला खाली उतरवून केईएमम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मात्र याप्रकरणात अंजली दमानियांनी गौरीच्या नणंदेवर गंभीर आरोप केलाय.

गौरीच्या आत्महत्या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात दीर अजय गर्जे, नणंद शीतल आंधळे आणि पती अनंत गर्जेविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. मात्र खरंच डॉ. गौरीने आत्महत्या केलीय की तिचा छळ करुन तिची हत्या? याचा निष्पक्षपणे तपास करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com