Relationship Tips  SAAM TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : जळणाऱ्या लोकांपासून सावधान! वाद न घालता स्वतः ला दूर कसं ठेवणार? जाणून घ्या

Ways To Handle Jealous People : दिवसभर आपण अनेक लोकांना भेटतो. काही आपले मित्र असतात तर काही फक्त ओळखीचे. मात्र यात काही लोक अशी असतात जे तुमच्यावर जळतात. तुमच्या चांगल्या गुणांवर कमी आणि कमतरतांवर अधिक लक्ष केंद्रित करून तुमच्याविषयी वाईट बोलतात.

Shreya Maskar

चांगल्या नात्यामध्ये मत्सराची भावना आल्याने नाते बिघडते. कारण ही भावना हळूहळू रागात रूपांतरित होते. त्यामुळे अशा व्यक्तींपासून आपण सावध राहिले पाहिजे. कारण या व्यक्ती आपल्याला धोका पोहचवू शकतात. तुम्हाला मानसिक आणि भावनिक दृष्ट्या इजा करण्याचा प्रयत्न करतात. कालांतराने तुम्हाल त्याच्यासोबत असुरक्षित वाटू लागते. अशा लोकांना तुमची प्रगती आणि आनंद मनात खुपतो. यामुळे तुमचा हेवा करणाऱ्या व्यक्तींपासून वेळीच सावध व्हा!

तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना कसे ओळखाल?

संधी मिळताच अपमान करणे

जी व्यक्ती तुमचा हेवा करत असेल ती तुम्हाला अपमानित करण्याची एक संधी सोडत नाही. वरिष्ठांसमोर तसेच तुमच्याच मित्रमंडळी समोर ती तुम्हाला अपमानित करते. कारण असे करून त्यांना स्वतःला सर्वोत्कृष्ट सिद्ध करायचे असेत. तुमच्यावर बारीक लक्ष ठेवून तुमच्यामधील उणीवा काढते.

दुसऱ्याशी तुलना

जी व्यक्ती तुमचा हेवा करते ती नेहमी तुमची दुसऱ्यांसोबत तुलना करते. तुम्हाला कमी लेखतात. अशा व्यक्ती सहसा तुमच्या जवळच्या मंडळीपैकी असतात. तुमच्याविषयी वाईट विचार करणाऱ्या व्यक्ती तुमची इतरांसमोर गोड बोलून नेहमी थट्टा उडवतात.

तुमच्या स्तुतीपासून दूर राहतील

जेव्हा कोणी तुमची स्तुती करत असेल हे त्यांना आवडणार नाही. ते तुमच्या स्तुतीपासून दूर राहतील. तुमच्या स्तुतीमुळे अशी लोक पटकन निराश होतात. तसेच तुमची वाईट प्रसिद्धी करतात. तुमच्यातील दोष शोधून तुम्हाल चुकीचे सिद्ध करतात. स्वतःच्या सद्गुणांचा पाढा वाचतात आणि इतरांच्या कमतरता शोधत राहतात.

तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्तींपासून कसे दूर रहाल?

वाद घालणे टाळा

त्या व्यक्तीसोबत वाद घालणे टाळा. कारण अशा लोकांना दुसऱ्या व्यक्तीची प्रतिमा खराब करण्यात आनंद मिळतो. त्यामुळे त्यांच्या अशा वाईट हेतूंना खतपाणी घालू नका. तुम्हाला डिवचून भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा लोकांना शांत राहूनच उत्तर दिले पाहिजे.

संवाद साधा

जर तुमच्यावर जळणारा हा तुमचा मित्र असेल तर, त्यांच्याशी बोलणे टाळण्या अगोदर त्यांच्याशी नीट संवाद साधा. गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. गोष्टी मिटवता येत असतील तर चांगल आहे. नाहीतर तो विषय तिथेच थांबवून टाका. न बोलता मित्राला दुर्लक्ष करून काही फायदा नाही. उलट तुम्हालाच त्याचा त्रास होईल. कोणत्याही समस्येचे मूळ कारण जाणून घेऊन प्रतिक्रिया देणे कधीही चांगले असते. जेव्हा आपला मित्रच आपला हवा करत असेल आणि वाईट विचार करत असेल. तर अशावेळी परिस्थिती सकारात्मकपणे हातळावी. कारण एक समज-गैरसमज तुमचे आयुष्य खराब करू शकते.

वैयक्तिक गोष्टी सांगणे टाळा

आपल्यावर जळणारी लोक ही नेहमी गोड गोड बोलून आपल्या कडून सर्व माहिती काढून घेतात आणि नंतर तीच माहिती आपल्याला अडचणीत घेऊन येते. त्यामुळे तुम्हाला नकारात्मक भावना देणाऱ्या लोकांशी कमी बोला आणि आपल्या आयुष्यामध्ये काय घडते हे त्यांना सांगू नका. वैयक्तिक गोष्टी मित्रांना किंवा इतरांना सांगणे भविष्यासाठी हानिकारक ठरू शकते. तुमचा हेवा वाटणाऱ्या व्यक्तीशी बोलताना कायम सावध राहावे. अशा व्यक्ती तुमच्या विषयी इतरांच्या मनात वाईट पसरवण्यास हुशार असतात. त्यामुळे यांच्याशी कमीत कमी , मोजून मापून आणि योजनापूर्वक बोला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार...

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT