Kalyan News: शाळेच्या संचालकाने बेदम मारहाण करत केलं अपमानित, विद्यार्थ्याने संपवलं जीवन; नेमकं काय आहे प्रकरण?

Kalyan Student Death: सोशल मीडियावर आपल्या मित्रांसोबत एका विद्यार्थ्यांनी संदर्भात पोस्ट केली म्हणून शाळा प्रशासनाने एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याचाच धसका घेत या विद्यार्थ्याने आपलं जीवन संपवलं.
शाळेच्या संचालकाने बेदम मारहाण करत केलं अपमानित, विद्यार्थ्याने संपवलं जीवन; नेमकं काय आहे प्रकरण?
Crime NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

कल्याण तालुक्यातील निंबवली गावात राहणाऱ्या 16 वर्षीय अनिश दळवी या विद्यार्थ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी अनिश याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत कल्याण जवळील म्हारळ येथील सेक्रेड हार्ट शाळेचे संचालक ऑलविन अँथोनी याच्यावर गुन्हा दाखल करीत अटक केली. ऑलविन अँथोनी याला आज कल्याण न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यावेळी कल्याण न्यायालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. न्यायालयाच्या आवारात मयत अनिश दळवी यांच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांनी ऑलविन अँथोनी याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. सोशल मीडियावर अनिशने आपल्या मित्रांसोबत एका विद्यार्थ्यांनी संदर्भात पोस्ट केली होती. शाळा प्रशासनाने पोस्ट टाकणाऱ्या विद्यार्थ्यांसह अनिशला बोलावून बेदम मारहाण करत तुमचे लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्या घरी येईल, अशी ताकीद देत घरी पाठवले होते. याचाच धसका घेत अनिशने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला.

शाळेच्या संचालकाने बेदम मारहाण करत केलं अपमानित, विद्यार्थ्याने संपवलं जीवन; नेमकं काय आहे प्रकरण?
MLA Milind Narvekar : विधानपरिषदेत मिलिंद नार्वेकर यांचा दणदणीत विजय, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल

कल्याण तालुक्यातील निंबवली गावात राहणारा अनिश दळवी हा कल्याणनजीकच्या वरप परिसरातील सीक्रेट हार्ट शाळेत इयत्ता 11 वीत शिकत होता. बुधवारी सकाळी अनिश याला शाळेने घरी पाठविले. अनिश घरी आला. त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिशच्या आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदानासाठी कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला.

अनिशच्या नातेवाईकांनी एखादा मुलगा काही गैरप्रकार करीत असेल त्याची माहिती शाळा व्यवस्थानाने पालाकांना दिली पाहिजे. तीन मुलांपैकी दोन मुलांच्या पालकाना शाळेने बोलावून घेतले होते. अनिशच्या पालकांना कोणतीही सूचना दिली गेली नाही. त्याला अपमानास्पद वागणूक दिली ,मारहाण केली, अनिशने याचा धसका घेतला. यामुळेच मानिसक तणावातून अनिशने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

शाळेच्या संचालकाने बेदम मारहाण करत केलं अपमानित, विद्यार्थ्याने संपवलं जीवन; नेमकं काय आहे प्रकरण?
Vidhan parishad election result 2022 : भाजपने विजयाचा झेंडा फडकवला, महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा ?

शाळेचे संचालक ऑलविन अँथोनी जबाबदार असल्याचा आरोप केला. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी तपास सुरू केला. टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणात शाळेचा संचालक ऑलविन अँथोनी यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

आज दुपारी यांना कल्याण कोर्टात हजर करण्यात आले . यावेळी न्यायालयात अनिष दळवी याचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात जमले होते. यावेळी अनिशच्या नातेवाईकांनी घोषणा देत ऑल्विन अँथोनीविरोधात कठोर कारवाई करा, अशी मागणी केली. तसेच कल्याण न्यायालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. ऑलविन अँथोनी याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com