Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Saam tv

Vidhan parishad election result 2022 : भाजपने विजयाचा झेंडा फडकवला, महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा ?

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भारतीय जनता पक्षाने विधान परिषद निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला आहे.
Published on

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भारतीय जनता पक्षाने विधान परिषद निवडणुकीत (Vidhan parishad election 2022) विजयाचा गुलाल उधळला आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी मुंबईच्या विधान भवनात आज ५ वाजता मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही 'आक्षेपनाट्य' रंगले. दोन तासांच्या विलंबानंतर अखेर मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. या निवडणुकीत एकूण २८५ आमदारांनी मतदान केले. दरम्यान विधान परिषदेच्या निकालाचा गजर वाजला.

Mahavikas Aghadi
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत घट, मुंबईलाही किंचित दिलासा, पण....; आजची आकडेवारी पाहाच

भाजपकडून या निवडणुकीत पाचवा उमेदवार म्हणून प्रसाद लाड यांचं नाव निश्चित केलं होतं. त्यांच्या विरोधात कॉंगेसचे बडे नेते भाई जगताप (Bhai Jagtap) निवडणूक लढवत होते. अंत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पाच जागांवर बाजी मारल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेत विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची रणनीती यशस्वी झाली. दरम्यान, आजही विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे सर्वच्या सर्व पाच उमेदवारांनी विजयाचा झेंडा फडकवला आहे.

भाई जगताप आणि प्रसाद लाड (Prasad lad) यांच्यात झालेल्या कॉंटे की टक्करमध्ये अखेर प्रसाद लाड यांचा विजय झाला आणि भाजपच्या गोटातून राजकीय वर्तुळात विजयाचा धुरळा उडाला. दुसरीकडे पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली तेव्हा कॉंग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यात चुरशीची लढत झाली. कॉंग्रेसचे या दोन्ही उमेदवारांच्या झालेल्या लढतीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला असून भाई जगताप विजयी झाले.

Mahavikas Aghadi
संतापजनक! वेडसर महिलेला मारहाण करुन बलात्कार केला, नराधम गजाआड

विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी नुकतीच पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष झाला. महाविकास आघाडीकडून सहा तर भाजपने पाच उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यानंतर आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले होते. नुकताच निकाल जाहीर करण्यात आला असून भाजपचे पारडे जड असल्याचे दिसते. दरम्यान, राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर आणि (Eknath khadse) एकनाथ खडसे, शिवसेनेचे (Sachin Ahir) सचिन अहिर,आमशा पाडवी तर कॉंगेसचे भाई जगताप विजयी झाले आहेत. दुसरीकडे भाजपचे राम शिंदे, प्रवीण दरेकर (Pravin darekar), श्रीकांत भारतीय,उमा खापरे विजयी झाले असून प्रसाद लाड यांचा विजयाने महाविकास आघाडीला धक्का दिलाय.

दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही आमदारांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे ५१ आमदार असतानाही ५३ मते मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीला दोन मते जास्त मिळाली आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेची १२ मते फुटली. तसेच भाजपला राज्यसभा निवडणुकीत १२३ मतं मिळाली होती. परंतु आजच्या निवडणुकीत १३३ मतं मिळाल्याने भाजपला दहा अधिकची मतं मिळाली.

रामराजे निंबाळकर - 27

एकनाथ खडसे - 29

आमशा पाडवी - 26

सचिन अहिर - 26

श्रीकांत भारती - 30

राम शिंदे - 30

प्रविण दरेकर - 29

उमा खापरे -27

काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानाला आक्षेप घेतला

काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानाला आक्षेप घेतला होता.मतदान करताना मतपत्रिकेवर सही केली पण पसंतीची मत देताना दुसऱ्याची मदत घेतली असा आरोप करत काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतला होता.गुप्त मतदान असताना दुसऱ्यांची मदत घेतल्याने ही हरकत घेतली.

राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे आक्षेप फेटाळले

राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे आक्षेप फेटाळले. याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लेखी कळवलं. कॉंग्रेसने भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानाला आक्षेप घेतला होता.मतदान करताना मतपत्रिकेवर सही केली पण पसंतीची मत देताना दुसऱ्याची मदत घेतली, असा आरोप काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर घेतला होता.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com