Psychology Tips: समोरच्या व्यक्तीचा लबाडपणा 'या' ५ पद्धतीने ओळखा, लगेच कळेल मनातले काळेबेरे

Relationship Tips: खोटं बोलणारा कितीही हुशार असला तरी त्याला पकडणं तितकेसं अवघड नसते. आज आपण काही सायकॉलॉजिकल टिप्स जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही समोरची व्यक्तीचा लबाडपणा सहज पकडू शकतात.
Psychology Tips: समोरच्या व्यक्तीचा लबाडपणा 'या' ५ पद्धतीने ओळखा, लगेच कळेल मनातले काळेबेरे
Relationship Tips
Published On

खोटं बोल पण रेटून बोल अशी म्हण आपण ऐकली असेल. असं वागल्याने समोरील व्यक्ती काय बोलतो त्यावर आपण लागलीच विश्वास ठेवत असतो. खोटं बोलण्याची एक कला असते, परंतु खोटं बोलणारा व्यक्ती कितीही हुशार असला तरी त्याचा खोटारडापणा त्याच्या वागण्या आणि बोलण्यातून सहज ओळखता येतो. एखादी व्यक्ती खोटे बोलण्यात कितीही पटाईत असली तरी मानसशास्त्रानुसार त्याचे खोटे बोलणे वागणूक पाहून क्षणार्धात ओळखले जाऊ शकते.

बोलण्याची पद्धत बदलते

जर एखादी व्यक्ती खोटे बोलत असेल तर त्याची बोलण्याची पद्धत पूर्णपणे बदलते. साधारणपणे एखाद्या व्यक्तीची बोलण्याची पद्धतीवरुन त्याचा खोटेपणा ओळखतो. जेव्हा समोरील व्यक्ती खोटे बोलते तेव्हा त्याची संभाषणाची बोलण्याची स्टाइल बदलते. काही लोक खोटे बोलत असताना त्यांच्या सामान्य बोलण्याच्या वेगापेक्षा जास्त वेगाने बोलू लागतात.

तर काही लोक खूप विचार करून बोलू लागतात. जेव्हा कोणी तुमच्याशी बोलत असेल तेव्हा त्याच्या बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या. जर तुम्हाला त्या व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धतीत बदल दिसला तर लगेच समजून घ्या की समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे.

खोटं बोलणार डोळ्यात पाहून बोलत नाही

समोरील व्यक्ती खरे बोलत आहे की खोटे हे शोधण्यासाठी, त्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे लक्ष द्या. खोटे बोलणारा माणूस कधीही डोळ्यांत पाहून बोलत नाही. समोरील व्यक्तीचे डोळे खालीच राहतात किंवा तो इकडे तिकडे पाहत राहतो. म्हणून जर एखादी व्यक्ती डोळ्यांशी संपर्क साधत नसेल आणि तिचे डोळे इकडे तिकडे करत असेल तर ती व्यक्ती खोटे बोलत असल्याचं समजावं.

बोलण्यात आणि वागण्यात फरक

खोटे बोलणारा व्यक्ती खूप अस्वस्थ होते. कोणी खोटं बोलण्यात माहीर असला तरी त्याला पकडले जाण्याची भीती वाटत असते. खोटं बोलतांना शब्द आणि कृतीमध्ये बदल दिसतो.

आत्मविश्वासाचा अभाव

जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलत असते तेव्हा त्याला पकडले जाण्याची भीती असते. अशा स्थितीत त्याच्यात आपोआपच आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो. आत्मविश्वास कमी असल्यास समोरील व्यक्ती आपले हात चोळू लागते, नखे चावते आणि अस्वस्थतेने पाय हलवते. यासोबतच तो आपले भाव लपवण्यासाठी पुन्हा पुन्हा तोंड किंवा डोळे बंद करू लागतो.

Psychology Tips: समोरच्या व्यक्तीचा लबाडपणा 'या' ५ पद्धतीने ओळखा, लगेच कळेल मनातले काळेबेरे
Couple Relationship : नात्यात 'ही' एक चूक ठरू शकते 'ब्रेकअप' चं कारण, वेळीच स्वतःला सावरा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com