Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Delhi AAP News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहारच्या तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal NewsSaam Tv

Arvind Kejriwal Latest News

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहारच्या तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. केजरीवाल यांना भेटण्याची परवानगी कुणालाही दिली जात नसल्याचं आपने म्हटलं आहे. मोदी सरकार अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडत आहे, अशी टीकाही आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

Arvind Kejriwal News
Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

जनतेने निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणे शोभते का? असा सवालही आप नेत्यांनी केला आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती.

यानंतर त्यांना १ एप्रिलपासून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. नुकतीच न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मेपर्यंत वाढ केली आहे. अरविंद केजरीवाल यांना आठवड्यातून फक्त २ वेळाच भेटता येऊ शकते, असं न्यायालयाने सांगितलं आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीने त्यांना भेटण्यासाठी नियमानुसार परवानगी मागितली होती. मात्र, तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली नाही, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. आता बायकोलाही नवऱ्याला भेटता येणार नाही का? असा सवाल आपकडून विचारण्यात आलाय.

दुसरीकडे तिहार प्रशासनाने या आरोपांचं खंडण केलं आहे. नियमानुसार केजरीवाल यांना आठवड्यातून दोन वेळा भेटण्याची परवानगी दिली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Arvind Kejriwal News
Narendra Modi Sabha: भाजपकडून प्रचारसभांचा धडाका, PM मोदी दिवसभरात घेणार ४ सभा, कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com