Narendra Modi Sabha: भाजपकडून प्रचारसभांचा धडाका, PM मोदी दिवसभरात घेणार ४ सभा, कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी

Lok Sabha Election 2024: मोदी कर्नाटक दौऱ्यावर असून दिवसभरात ४ मोठ्या सभा घेणार आहेत. या सभेत ते नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Narendra Modi Parbhani
Narendra Modi Parbhani Saam TV

Narendra Modi Karnataka sabha

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभांचा धडाकाच लावला आहे. आज मोदी कर्नाटक दौऱ्यावर असून दिवसभरात ४ मोठ्या सभा घेणार आहेत. या सभेत ते नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Narendra Modi Parbhani
Shirur Loksabha: अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात! शिरुर मतदार संघात घेणार ५ सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आजपासून दोन दिवसांचा कर्नाटक दौरा करणार आहे. यादरम्यान ते ५ जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा घेऊन जनतेला संबोधित करतील. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी रात्री बेळगावात आगमन झाले. आज सकाळी येथील जाहीर सभेला संबोधित करतील.

दुपारी १ वाजता मोदी सिरसीला येथे सभा घेतील. यानंतर मोदींचा पुढचा मतदारसंघ दावणगिरी हा असणार आहे. याठिकाणी दुपारी ३ वाजता मोदी निवडणूक रॅलीत सहभागी होऊ शकतात. सायंकाळी ५ वाजता मोदी बल्लारी येथील प्रचारसभेतून जनतेला संबोधित करतील.

आज दिवसभरात ४ सभा घेतल्यानंतर मोदी उद्या सोमवारी बागलकोट येथे ११ वाजता सभेला जातील. यंदाच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) ४०० जागा जिंकण्याचा भाजपचा मानस आहे. यासाठी ठिकठिकाणी मोदी आणि अमित शहांच्या सभांचं आयोजन केलं जात आहे. मोदी देशातील प्रत्येक राज्यात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत.

नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांवर अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. दरम्यान, निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दोन टप्प्यात नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर त्यांनी घणाघाती टीका केली. काँग्रेसनेही मोदींच्या सभेला चांगलंच उत्तर दिलं आहे.

कर्नाटकात काँग्रेसने ओबीसींचे २७ टक्के आरक्षण मुस्लिमांना बहाल केले. देशात त्यांची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण ते धर्माच्या नावांवर वाटल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोल्हापूरात येथील सभेतून केली होती.

काँग्रेसने कर्नाटकात एससी, एसटी, ओबीसींचे २७ टक्के आरक्षण मुस्लिमांना देण्यासाठी त्यांनी एका रात्रीत आदेश काढला. देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर ते हाच फॉर्म्युला देशात लागू करतील, असंही मोदी म्हणाले होते. आज कर्नाटकात ते नेमकं काय बोलणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Narendra Modi Parbhani
Delhi Politics: निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com