Shirur Loksabha: अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात! शिरुर मतदार संघात घेणार ५ सभा

Loksabha Election 2024: शिरुरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू होणार आहे. शिरुर लोकसभेत शरद पवार यांच्या ५ सभा होणार आहेत.
Ajit Pawar, Sharad Pawar and Amol Kolhe
Ajit Pawar, Sharad Pawar and Amol KolheSAAM TV

सागर आव्हाड, पुणे|ता. २८ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. शिरुरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू होणार आहे. शिरुर लोकसभेत शरद पवार यांच्या ५ सभा होणार आहेत.

शिरुरमध्ये महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिल्यानंतर शिरुर लोकसभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच आता अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार आहेत.

शिरुर मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण पाच सभा होणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत 7 मे रोजी रॅली असणार आहे. शिरुर-हवेली, हडपसर, आंबेगाव-शिरुर, खेड -आळंदी, जुन्नर या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी एक सभा होणार आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar and Amol Kolhe
Nashik Lok Sabha 2024: नाशिक लोकसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांचं दबावतंत्र? ओबीसींची ताकद दाखवण्यासाठी मोठी खेळी

शिरूर लोकसभा मतदारसंघ, सभांचे नियोजन

शिरूर - हवेली विधानसभा

२८ एप्रिल - उरळीकांचन, या. हवेली

जुन्नर विधानसभा

३० एप्रिल - ओतूर बाजार, ता. जुन्नर

हडपसर विधानसभा

६ मे - कात्रज

भोसरी विधानसभा

७ मे - मा. आदित्य ठाकरे यांची रॅली

आंबेगाव - शिरूर विधानसभा

८ मे - रांजणगाव, ता. शिरूर

खेड - आळंदी विधानसभा

१० मे - चाकण बाजार समिती आवार

Ajit Pawar, Sharad Pawar and Amol Kolhe
Nashik Lok Sabha 2024: नाशिक लोकसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांचं दबावतंत्र? ओबीसींची ताकद दाखवण्यासाठी मोठी खेळी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com