Anger Control SAAM TV
लाईफस्टाईल

Anger Control : छोट्या गोष्टींवर पटकन रागवता? स्वतः चा खूप राग येतो? 'या' टिप्स पाळा, पडाल स्वतः च्या प्रेमात

Mental Health : राग येणं स्वाभाविक गोष्ट असली तरी तिचे प्रमाण नियंत्रणात असणे खूप जास्त गरजेचे असते. स्वतःवर सतत रागवत राहिल्यास आपल्या व्यक्तिमत्वावर नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे स्वतःवर प्रेम करणे महत्त्वाचे आहे.

Shreya Maskar

एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपल्याला लगेच राग येतो. मात्र राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. स्वतः वर भरपूर राग काढल्यामुळे आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते. आपली एकाग्रता हरवते. आपण नीट विचार करून शकत नाही.

अति रागामुळे आयुष्यावर होणारे परिणाम

  • माणूस हा चुकांमधून शिकत असतो. त्यामुळे चुका करणे सामान्य गोष्ट आहे. पण त्या चुका वारंवार होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आयुष्यातील एक चूक संपूर्ण आयुष्य स्वतःचा राग करायला पुरेशी असते. आपण कधीच स्वतःला त्या गोष्टीसाठी माफ करत नाही. भविष्यात मोठे निर्णय घेताना आपण घाबरू लागतो.

  • मनात जास्त राग ठेवल्यास हृदयविकार, ब्लडप्रेशरचा धोका वाढतो. तसेच इतर अनेक आजार उद्भवतात.

  • अति रागामुळे स्वतःसोबत तर नातं खराब होत. तसेच जुनी घट्ट नाती तुटू लागतात.

  • अति रागाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. आपण नैराश्य , चिंता, तणावात अडकतो.

  • राग नियंत्रणात ठेवण्यासाठी आपली चूक कबूल करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा आपण असे करतो, तेव्हा आपण ती परिस्थिती स्वीकारून पुढे जातो. स्वतःला जास्त दोष देत राहिल्यास आपण नकारात्मक प्रभावाखाली येतो.

असा करा स्वतःवरील राग कंट्रोल

स्वतःशी संवाद साधा

रागाचे मूळ कारण समजून घ्या आणि स्वतःच्या भावनांचा आदर करा. स्वतःशी संवाद साधा. त्यातून नक्की तुमचे मन शांत होईल आणि राग नियंत्रणात राहील. बरेच वेळा आपण स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवतो. त्या दडपणाखाली आपल्याकडून कही चुका होतात आणि त्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा राग येतो. दु:ख आणि राग यांचे मिश्रण होऊन तुमचे मानसिक आरोग्य बिघडते. त्यामुळे गोष्टींना प्राधान्य देऊन काम करा. स्वतःवर कोणत्याही कारणामुळे राग आला असेल तर तो मनात न ठेवता. स्वतः शी बोला. यासाठी तुम्ही आरशाची मदत घेऊ शकता. आरशासमोर उभे रहा आणि स्वतः शी संवाद साधा.

स्वतःवर प्रेम करा

राग कमी करण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावनांचा आदर कराल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जगालं. तुमचे आवडते छंद जोपासा . सोलो ट्रिप जा. स्वतः सोबत वेळ घालवा. स्वतःला चांगले समजून घ्या. मित्रांशी आणि कुटुंबाशी संवाद साधा. आपले मन शांत करण्यासाठी नियमित ध्यान, योगा आणि व्यायाम करा. सकस आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. यामुळे तुमची चिडचिड होणार नाही आणि राग देखील कमी येईल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील थरारक ट्रेकिंग स्पॉट, पर्यटक येथे जाताना 100 वेळा विचार करतात

Ladki Bahin Yojana : लाडकीसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी सरकारचा आणखी एक नियम, पती किंवा वडिलांची माहिती द्यावीच लागेल, वाचा

Badshah : बादशाहने खरेदी केली कोट्यवधींची कार, किंमत वाचून घाम फुटेल

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Amravati Shocking News: गर्लफ्रेंड- बॉयफ्रेडचं भांडण पेटलं, तरूणाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारण्याची दिली धमकी,VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT