Career Tips : नोकरी सोडण्याआधी 'ही' चूक करू नका; भविष्यात होईल नुकसान

Tips For Quitting Job : नोकरी प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत आणि पैसा दोन्ही गोष्टी लागतात. त्यामुळे नोकरी सोडताना संपूर्ण विचार करा.
Tips For Quitting Job
Career TipsSAAM TV
Published On

नोकरी सोडताना चुकूनही घाईत निर्णय घेऊ नका. कारण तुमचा एक निर्णय तुमचे आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे जॉब सोडायचा असल्यास सारासार विचार करणे खूप गरजेचे असते. कारण नोकरी चांगले आयुष्य घडवण्यासाठी गरजेची असते. नोकरी बदलताना नेहमी आर्थिक परिस्थिती आणि करिअरचा विचार करावा. कारण या दोन गोष्टींवर जॉबचा खूप परिणाम पडतो.

भविष्याचा विचार

नोकरी सोडण्याआधी भविष्याचा सारासार विचार करा. कारण नोकरी म्हटली की, ताण आलाच. त्यामुळे ताणाला वैतागून नोकरी सोडत असाल तर नीट विचार करा. नवीन नोकरीवरही ताण मिळणार आहे. काही लोकांना एकाच ठिकाणी जास्त वेळ जॉब करून कंटाळा येतो. म्हणून ती लोक अनेक वेळा जॉब बदलतात. अनेक वेळा त्यामुळे त्यांची चिडचिड देखील होते. नवीन नोकरी नक्की तुमच्या मनासारखी आहे ना, याचा संपूर्ण विचार करा आणि मग नवीन प्रवासाला सुरूवात करा.

नोकरीत क्षेत्र बदलणे

बरेच लोक आवडीमुळे किंवा अधिक पैसे मिळतील या अपेक्षेमुळे लोक क्षेत्र बदलतात. मात्र आपण ज्या नवीन क्षेत्रात जाणार आहोत त्याचा परिपूर्ण अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर तिकडे तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल.सतत क्षेत्र बदल्याने आपल्या करिअरवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे एका क्षेत्रात तटस्थ राहून प्रगती करा. नवीन क्षेत्रातील मर्यादा, उणिवा आणि आव्हाने यांचा आधीच अभ्यास करा. कौशल्ये, क्षमता, तंत्रज्ञान शिकून घ्या. नवीन क्षेत्र म्हणजे संपूर्ण नवीन प्रवास त्यामुळे छान मानसिक तयारी करा.

नोकरी सोडण्याच्या कारणाचा पूर्ण विचार

तुम्ही नोकरी नेमकी का सोडत आहे, याचे स्पष्ट कारण स्वतः जाणून घ्या. तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला तिकडे जुळवून घ्यायला त्रास होत असेल तर, खरंच आपला स्वभाव तपासा. कारण नव्या जॉबमध्ये सुद्धा ही अडचण येऊ शकते.

Tips For Quitting Job
Relationship Tips : स्वर्गाहून सुंदर होईल तुमचा संसार; फक्त 'या' गोष्टी फॉलो करा

स्वतः वर लक्ष द्या

नोकरी बदलण्याआधी आपल्यातल्या उणीव जाणून घेऊन त्यावर काम करा. कारण नवीन ठिकाणी तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल हे सांगता येणार नाही. नवीन नोकरी शोधताना स्वतःचा स्वभाव, गरजा, मानसिकता पाहून नोकरी शोधा. तुमचे आवडते क्षेत्र निवडा जेणेकरून परत नोकरी क्षेत्रामुळे बदलावी लागणार नाही. नोकरी करताना तुमची तारांबळ उडणार म्हणून प्रवास आणि कुटुंबाचा विचार करा.

आर्थिक नियोजन

जर तुम्हाला नवीन नोकरी मिळाली नसेल आणि तुम्ही जुनी नोकरी सोडत असाल तर, आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे असते. नोकरी सोडण्याचा विचार मनात आल्यावर सर्वात आधी आपल्यापेक्षा जास्त जाणकार असलेल्या व्यक्तींशी बोला. त्यांचे मार्गदर्शन घ्या आणि मगच योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Tips For Quitting Job
Parenting Tips : मुलांचा हट्टीपणा वाढत चाललाय? 'या' टिप्सच्या मदतीने मोबाईल गेमपासून राहतील दूर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com