Parenting Tips : मुलांचा हट्टीपणा वाढत चाललाय? 'या' टिप्सच्या मदतीने मोबाईल गेमपासून राहतील दूर

Kids Online Gaming Addiction : मोबाईल गेम्स खेळण्याच्या या सवयीने मुलांच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो. मुलांचा स्वभाव सतत रागीट होतो.
Kids Online Gaming Addiction
Parenting TipsSaam TV
Published On

लहान मुलांमध्ये दिवसेंदिवस मोबाईल गेम्स खेळण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. गेम खेळण्याची मुलांना इतकी सवय झाली आहे की, त्यांना दुसरं काहीच सुचत नाही. मोबाईल गेम्स खेळण्याच्या या सवयीने मुलांच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो. मुलांचा स्वभाव सतत रागीट होतो. त्यांची चिडचिड वाढते. त्यामुळे आज मुलांना फोन आणि अन्य गेम्सपासून दूर ठेवण्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Kids Online Gaming Addiction
Parenting Tips: लहान मुले जेवणासाठी नाक मुरडतात? या ४ गोष्टी करा

गप्पा मारा

लहान मुलांना सतत खेळण्यासाठी कोणी ना कोणी हवं असतं. त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी, बोलण्यासाठी कोणीही नसतं. त्यामुळे ते सतत गेम्समध्ये आपलं मन रमवतात. अशावेळी पालक आपल्या मुलांना ओरडतात. त्यांच्यावर रागवतात. मात्र असे केल्याने मुलं आणखी जास्त हट्टी बनतात. त्यामुळे त्यांना ओरडण्याऐवजी त्यांच्यावर प्रेम करा. त्यांच्याशी गप्पा मारा. तसेच त्यांना गेम्स किती हानिकारक आहेत याची जाणीव करून द्या.

टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने समजवा

तुम्ही लहान मुलांना फोनपासून दूर ठेवण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करू शकता. त्यासाठी आधी तुमच्या फोनमध्ये वयाची मर्यादा सेट करून घ्या. त्यावरून तुमची मुलं हा फोन आणि गेम्स का खेळू शकत नाहीत याची माहिती त्यांना समजेल. ही माहिती त्यांना सांगत असताना त्यांच्याशी भांडण करू नका.

शेड्यूल

मुलांकडून फोन सुटत नसेल तर तो लगेच काढून घेऊ नका. मुलांसाठी एक वेळापत्रक तयार करा. मुलं त्यांच्या मोकळ्या वेळात फोन वापरत असतील तर ते केव्हा फोन वापरतात याची माहिती जाणून घ्या. तसेच तुम्ही स्वत: त्यांना फोन वापरण्यासाठी दिवसातील १० मिनिटे वेगळी काढून ठेवा आणि याच वेळात त्यांना फोन खेळण्यासाठी द्या.

स्वत:मध्ये बदल करा

तुमची मुलं जास्त फोन वापरत असतील तर त्यांना योग्य ती सवय लागणे महत्वाचे आहे आणि ही सवय तुम्हाला स्वत:ला आधी लावून घ्यावी लागेल. त्यासाठी स्वत:मध्ये बदल करावा लागेल. त्यामुळे तुम्ही जमेल आणि शक्य असेल त्याहून जास्तवेळ मुलांसह खेळण्यात आणि त्यांना प्रॅक्टीकली विविध गोष्टी शिकवण्यात वापरा.

Kids Online Gaming Addiction
Parenting Tips: लहान मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना 'हे' 3 प्रश्न नक्की विचारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com