सध्याच्या काळात पालक कमी वयातच मुलांना मोबाईल आणि लॅपटॉप खरेदी करून देतात. त्यामुळे दिवसाचा जास्त काळ सोशल मीडियावर घालवतात. यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. मुलं व्हॉटसअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब यांवर अधिक काळ घालवतात. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ऐकलं कोंडा स्वभावाचे होतात. ते आणि त्यांचा सोशल मिडिया एवढे त्यांचे जग राहते. तसेच त्यांना सतत इतरांकडून स्वतः चे कौतुक व्हावे असे वाटते.
सोशल मीडियाचा अति वापरामुळे तणावग्रस्त, चिंता, नैराश्य, झोपेचे विकार उद्भवतात. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होताना पाहायला मिळते. सोशल मीडियामुळे मुलांच्या फसवणुकीचा धोका वाढला आहे. यामुळे मुलांच्या मनावर नकारात्मक प्रभाव पडतो. सोशल मीडियावर मुलं असंख्या गोष्टी पोस्ट करत असतात. मात्र त्यात एखाद्याने निगेटिव्ह कमेंट केली तर मुलांच्या भावना दुखावल्या जातात. मुलांचा आत्मविश्वास डळमळू लागतो.
मुलांनी सोशल मीडियाचा वापर किती करावा?
दीड ते दोन तासांच्यावर मुलांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा.
तसेच फक्त ३० मिनिटांत मुलांचा मूड सोशल मीडियामुळे फ्रेश होतो.
मुलांना सोशल मीडियाचे व्यसन लागले कसे ओळखाल?
मुल जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवत असतील.
सोशल मीडियामुळे त्यांचे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत असेल.
सतत सोशल मीडियाबद्दल बोलणे आणि त्याचा विचार करणे.
सतत मोबाईल स्क्रोल करत राहणे.
अभ्यासातील लक्ष कमी होणे.
एखाद वेळी मोबाईल नसल्यास सतत चिडचिड करणे.
घरातील बोलण्याकडे लक्ष न देता सोशल मीडियामध्ये व्यस्त राहणे.
पालकांनी कोणती काळजी घ्यावी?
मुलांनी जास्त वेळ सोशल मीडियावर घालवू नये म्हणून पालकांनी मुलांना वेळ द्यावा.
पालकांनी मुलांना फक्त मोबाईल, लॅपटॉप खरेदी करून न देता, त्याचा योग्य वापरही करायला शिकवले पाहिजे.
सोशल मीडियाचे आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट सांगावे. यामुळे मुलं सोशल मीडियाचा वापर करताना विचार करतील.
वर्तमानातील सोशल मीडियाचा वापर त्यांचे भविष्य धोक्यात आणू शकतो हे पालकांनी मुलांना समजवून सांगावे.
पालकांनी मुलांचे दिवसाचे वेळापत्रक तयार करावे. यामध्ये सोशल मीडियाचा वापर किती करावा हे सांगणे गरजेचे आहे.
जेवताना आणि रात्री झोपताना सोशल मीडियाचा वापर टाळावा.
मुलांना त्यांचे इतर छंद जोपासण्यास प्रोत्साहन करा.
पालकांनी ही स्वतः मुलांसमोर सोशल मिडिया वापर कमी करा. कारण मुलं तुमच अनुकरण करत असतात.
गरज भासल्यास मानसिक आरोग्य समुपदेशकाला भेट द्या.
डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.