बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. नैराश्य, ताण यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उत्तम मानसिक आरोग्य ठेवणे ही महत्वाची गरज झाली आहे. वेळीच आपले मानसिक आरोग्य सुधारा आणि तणावमुक्त जगा. तणावमुक्त जगण्यासाठी गाणी ऐकणे रामबाण उपाय आहे.
आरोग्य धोक्यात
आपला मेंदू नीट सक्रिय असेल तर शरीराचे कार्य उत्तम राहते. चिंता आणि तणाव असल्यास झोपेचा अभाव वाढतो. आपली रोग प्रतिकारशक्ती कमी होते. पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात.तणावामुळे सांधेदुखी वाढते आणि स्नायूंमध्ये समस्या निर्माण होतात. आपले नातेसंबंध बिघडतात. यामुळे मानसिक तणावाकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार केले पाहिजे. तणावामुळे लोक व्यसनाच्या अधीन जातात. त्यापेक्षा गाणी ऐकण्याचे व्यसन तुम्हाला मानसिक ताणापासून बाहेर काढेल.
आवडीची गाणी ऐकणे
गाणी ऐकणे हा मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी रामबाण उपाय आहे. मानवी शरीर हे स्पंदनं शोषून घेऊन आपल्यातल सकारात्मक बदल घडवून आणते. अनेक वेळा गाण्यातील शब्दांपेक्षा गाण्याची म्युझिक मनाला सुखावून जाते. गाण्याच्या तालावर मनशांती मिळते. ताण कमी होतो. गाण्यांच्या म्युझिकमुळे मेंदूमध्ये भावनिक क्रिया जागृत होते. संगीत ऐकून मेंदू जागृत होऊन आपल्याला आनंदाची अनुभूती मिळते. आपल्या आवडीची गाणी नेहमी मानसिक आरोग्य सुधारण्यास आपल्याला मदत करतात. तणाव दूर करण्यासाठी शांत आणि हळूवार म्युझिकची गाणी महत्वाची ठरतात. गाण्यावर तुमचे मन आणि शरीर कसे उत्तर देते यावरून सकारात्मकता दिसून येते.
मानसिक तृप्ती
संगीत आपल्यातील अनुभूती, अनुभव, भावना यांना वाट मोकळी करून देत. एखाद्या गाण्याची लय धरून नाचणे किंवा ते गाणे अनुभवणे मानसिक तृप्ती देते. गाणे मनातील भावना जागृत करून डिप्रेशन , एन्झायटी यांची तीव्रता कमी करते. गाणी मानातील सुप्त भावनांची वाट मोकळी करून देतात. कोणाला लाऊड म्युझिक आवडते तर कुणाला शांत. आपापल्या आवडीनुसार प्लेलिस्ट अपडेट करा. मन मोकळ करण्यासाठी मनसोक्त गाणी ऐका.
डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.