Brain Eating Amoeba : मानवी मेंदू खाणाऱ्या अमिबाचा धोका वाढला! आतापर्यंत ३ मुलांचा घेतलाय जीव, कसा होतो संसर्ग?

Fourth case of Brain Eating Amoeba : मेंदू खाणाऱ्या अमिबाच्या विळख्यात आणखी एका १४ वर्षीय मुलाला या आजाराची लागण झाली आहे. १ जुलै रोजी त्याला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
Fourth case of Brain Eating Amoeba
Brain Eating AmoebaSaam TV
Published On

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाच्या विळख्यात आणखी एक मुलगा सापडला आहे. १४ वर्षीय एका मुलाला या आजाराची लागण झाली आहे. १ जुलै रोजी त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले, तेव्हा त्याला अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस असल्याचं डॉक्टर म्हणाले.

Fourth case of Brain Eating Amoeba
Brain Stroke: या वाईट सवयींमुळे होतो ब्रेन स्ट्रोक, आजपासूनच बदला लाईफस्टाईल

हा मुलगा उत्तर केरळ जिल्ह्यातील पयोली येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. मुलाच्या उपचारामध्ये त्याला विदेशी औषधे देण्यात आलीत. सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

हा आजार कसा होतो?

मे महिन्यापासून केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाची दहशत पसरली आहे. या रोगामुळे आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मेंदू खाणारा हा जिवाणू दूषित पाण्यात असतो. या पाण्यात आंघोळीसाठी किंवा पोहण्यासाठी गेल्यावर नाकामार्फत तो शरीरात प्रवेश करतो, अशी माहिती वैद्यकीय तज्ञांनी दिली आहे.

२१ मे रोजी या रोगाचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला होता. एका ५ वर्षांच्या मुलीला या रोगाची लागण झाली होती. त्यात तिचा मृत्यू झाला.

हा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

मेंदू खाणाऱ्या अमिबाची लागण होऊ नये यासाठी बाहेर पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळा.

पावसामुळे अनेक व्यक्ती धबधबा आणि नदी अशा ठिकाणी फरण्यासाठी जातात, ते बंद केलं पाहिजे.

दूषित पाण्यापासून दूर राहा.

साठलेल्या किंवा दूषित पाण्यातमध्ये उतरू नका.

दूषित पाण्यात आंघोळ करू नका. पाणी थोडं जरी गढूळ असेल तर त्यामध्ये उतरणे टाळा.

काही कारणास्तव पावसात भीजले असाल किंवा साढलेल्या पाण्यातून घरी आले असाल, तर लगेचच गरम पाण्याने आंघोळ घ्या.

Fourth case of Brain Eating Amoeba
Brain Eating Amoeba: केरळात मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; काय आहेत धोकादायक आजाराची लक्षणे?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com