Priya More
ब्रेन स्ट्रोक होण्यामागे अनेक कारणं आहेत. आपल्या रोजच्या जीवनशैलीच्या सवयी ब्रेन स्ट्रोकसाठी कारणीभूत आहेत.
आपल्या काही वाईट सवयी आहेत ज्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असते. त्यामुळे या सवयी लवकर बदलाव्यात.
ब्रेन स्ट्रोक येण्यामागे धुम्रपान हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद आणि कडक होतात ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.
सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट, कोलेस्टेरॉल आणि सोडियम जास्त असलेल्या आहारामुळे लठ्ठपणा आणि रक्तदाब वाढतो. या आहारामुळे ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो.
बैठी जीवनशैली ब्रेन स्ट्रोकचा सर्वात जास्त धोका आहे. नियमित शारीरिक हालचालींद्वारे रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. हृदयाचे आरोग्य सुधारते आणि ब्रेन स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.
जी लोकं जास्त प्रमाणात मद्यपान करतात त्यांचा रक्तदाब लक्षणीय वाढतो आणि हृदयाचे ठोकेही अनियमित होतात. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.
जास्त ताणामुळे उच्च रक्तदाब होतो. ज्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे शक्य तितके आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब होतो. ज्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.
झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील नैसर्गिक प्रक्रियांवर विपरित परिणाम होतो आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. दररोज ७-९ तासांची शांत झोप घेतली पाहिजे.
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अॅट्रियल फायब्रिलेशन यासारख्या वैद्यकीय स्थिती स्ट्रोकसाठी जोखीम घटक मानल्या जातात. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर तुम्ही वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊनव औषधे घ्या. जर ही औषधं घेतली नाही तर ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो.
निर्जलीकरणामुळे, रक्ताची चिकटपणा वाढेल ज्यामुळे रक्ताची गुठळी होऊ शकते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होतो.