आजकालच्या धावपळीच्या जगात माणसाला नियमित व्यायाम करायला देखील वेळ मिळत नाही. अशा वेळी रोज सकाळी उठून किमान १५ ते २० मिनिटे गवतावर अनवाणी चालण्याचे आरोग्याला असंख्य फायदे होतात. गवतावर अनवाणी चालल्याने शरीरासोबत मनाचेही आरोग्य सुधारते. सकाळी गवतावर अनवाणी चालल्याने पायाखालच्या पेशींशी संबंधित मज्जातंतू सक्रिय होऊन मेंदूचे आरोग्य सुधारते.
पायांचे आरोग्य सुधारते
पायांच्या उत्तम आरोग्यासाठी सकाळी गवतावर अनवाणी चालावे. यामुळे पाय आणि गुडघ्याचे स्नायू मोकळे होतात. सकाळी थंड वातावरणात अनवाणी चालल्याने पायाखालच्या मऊ पेशींना आराम मिळतो.
हृदयाचे आरोग्य उत्तम
गवतावर अनवाणी चालणे हृदयाचे ठोक्यांमध्ये ताळमेळ राहतो. शरीराचे तापमान नियंत्रित राहते. आनंदी होर्मोन्स वाढतात.
मधुमेहावर फायदेशीर
मधुमेहाच्या रुग्णांना झालेली जखम लवकर भरत नाही. पण या लोकांनी हिरव्यागार गवतावर चालल्यास जखम भरण्यास मदत होते. पण मधुमेहाच्या रुग्णांनी ही खबरदारी घ्यावी की बाहेरचे वातावरण चांगले आणि स्वच्छ असेल. मोकळ्या हवेत चालल्याने ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक प्रमाणात होतो.
मानसिक आरोग्य
सकाळी गवतावर अनवाणी पायांने चालल्याने तणावातून मुक्त मिळते. मेंदू आणि मूड देखील फ्रेश होतो. सकाळची ताजी हवा, सूर्यप्रकाश, हिरवळ आपल्या मनाला ताजेतवाने करते. आपल्याला आलेले डिप्रेशन देखील कमी करते.
शरीराची सूज कमी होते
गवतावर अनवाणी चालण्याने शरीराची चांगली हालचाल होते. शरीराची सूज कमी होण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच कोवळ्या उन्हातून व्हिटॅमिन- डी मिळते. जे शरीराचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.
पावसाळ्यात गवतातून अनवाणी चालताना कोणती काळजी घ्यावी?
मुसळधार पावसात बाहेर फिरायला जाऊ नये.
पावसात संध्याकाळी गवतात फिरू नये. कारण डास चावण्याचा धोका वाढतो.
गवतात जाण्यापूर्वी चिखल नाही ना, याची दक्षता घ्यावी.
पावसाळ्यात सकाळी गवतात चालणे उत्तम राहील.
गवतातून फिरून आल्यावर पायांची नीट स्वच्छता करावी.
डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.