Eyes Protection in Summer: उन्हाळ्यात डोळ्यांची कशी घ्याल काळजी? या आयुर्वेदिक Tips फॉलो करा

Eye Care Tips at Home [in Marathi]: उन्हाळ्यात डोळ्यांची अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात धुळीचे छोटे कण हवेत राहतात, जे आपल्या डोळ्यांना इजा करतात. सतत स्क्रीन टाइममुळे डोळ्यांवर ताण येतो.
How To Protect Eyes In Summer Know In Marathi
How To Protect Eyes In Summer Know In MarathiSaam tv

आपल्या चेहऱ्याला सगळ्यात सुंदर बनवतात ते डोळे. परंतु, या डोळ्यांची काळजी घेणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. बदलेल्या जीवनशैलीनुसार हल्ली भारतात ९० टक्के लोकांना चष्मा आहे. यामध्ये डोळ्यांनी धुसर दिसणे किंवा डोळ्यांच्या इतर आजारांचा सामना करावा लागतो.

उन्हाळ्यात डोळ्यांची (Eye) अधिक काळजी (Care) घेणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात धुळीचे छोटे कण हवेत राहतात, जे आपल्या डोळ्यांना इजा करतात. सतत स्क्रीन टाइममुळे डोळ्यांवर ताण येतो. मोबाइल आणि लॅपटॉपचा वापर केल्याने डोळ्यांच्या आतील भागांना दुखापत होते. यामुळे डोके दुखणे, जळजळ होणे किंवा पाण्याचा निचरा होण्याची समस्या असू शकते.

How To Protect Eyes In Summer Know In Marathi
Kids Memory Power : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांची बुद्धी तल्लख करायचीये? जीवनशैलीत करा हे बदल
  • आयुर्वेदानुसार डोळ्यांचा संबंध पित्तदोषाशी आहे. हे पाचक अग्नी आणि चयापचय नियंत्रित करते. शरीरातील पित्ताचे संतुलन बिघडले की, डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जाणून घेऊया डोळ्यांची काळजी कशी घ्यावी त्याविषयी

  • डोळ्यावर थंड पाणी मारुन तुम्ही दिवसाची सुरुवात करु शकता. ज्यामुळे डोळ्यातील घाण निघून जाण्यास मदत होते.

  • डोळ्यांजवळ रासायनिक मेकअप उत्पादने वापरु नका. त्याऐवजी तुम्ही आयुर्वेदिक काजळचा वापर करा.

  • सूर्यप्रकाशाचा डोळ्यांच्या आरोग्यावर (Health) परिणाम होतो. सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे डोळ्यांना ऍलर्जी किंवा संसर्गाचा धोकाही होतो. त्यामुळे घराबाहेर पडताना सनग्लासेसचा वापर करा.

  • डोळ्यांची जळजळ थांबवण्यासाठी आणि त्यांना स्वच्छ करण्यासाठी दररोज १० मिनिटे गुलाब पाण्यात भिजवलेले कापसाचे पॅड डोळ्यांवर लावा. ज्यामुळे डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

  • आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी स्वत:ला हायड्रेटे ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. दिवसभर पुरेसे पाणी प्या. त्यासाठी आहारात फळे, हर्बल टी आणि ज्यूस याचे सेवन करा. यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा दूर होईल.

  • आपल्या आहाराचा डोळ्यांवर चांगला परिणाम होतो. आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा. फळे आणि भाज्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखी रसायने असतात. मोतीबिंदू सारख्या डोळ्यांच्या आजारांपासून संरक्षण करु शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com