Social Media Addiction : फूड रील्स बघितल्यानं वजन वाढतं का? ते कसं आणि काय आहेत कारण?

Mental Health : आजकाल सोशल मीडियावर रील्स पाहण्याचा मोह न आवरणारा आहे. मात्र यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होताना दिसतो. सतत फूड रील्स पाहिल्याने तुमचे वजन वाढू शकते. कसे ते जाणून घ्या.
Mental Health
Social Media AddictionSAAM TV
Published On

आजकाल अनेक लोक सोशल मीडियावर रील्स पाहण्यात मग्न असतात. इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर सतत रील्स पाहिल्यास आपण रील्सच्या व्यसनाधीन होतो. आपल्या आवडीनुसार प्रत्येक जण सोशल मीडियावर रील्स पाहत राहतो. सोशल मीडियावर नेहमी ट्रेंडिंग वर असलेला विषय म्हणजे फूड रील होय. मोठ्या संख्येने आपल्याला फूड रील्स आकर्षित करतात. शेवटी, स्वादिष्ट पदार्थ तयार होताना पाहणे कोणाला आवडत नाही? कारण ते मनाला समाधान देतात. मन आणि पोट भरून जाते.

फूड रील्स पाहिल्याने मेंदू देखील सक्रिय होतो. सतत रील्स पाहिल्यामुळे खाण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ शकतात. एका संशोधनानुसार, खाद्यपदार्थाची जाहिरात किंवा रील पाहिल्याने आपल्या मनावर परिणाम होतो. तसेच अन्नाचा मोह आवरत नाही. विशेषत, आवडत्या सेलिब्रिटीचा जंक फूडचा आस्वाद घेतानाचा व्हिडीओ आपल्यावर जास्त प्रभाव टाकून जातो. काही लोक आपला ताण तणाव दूर करण्यासाठी अशा रिल्स पाहतात आणि पदार्थांचा वास्तवात आस्वाद घेतात.

मानसिक आरोग्य

फूड रील्स पाहिल्याने आपल्या मनावर परिणाम होतात. आपल्या मनात चांगले सकारात्मक विचार येतात. तसेच आपला मूड देखील फ्रेश होतो. फूड रील्स पाहिल्याने तुम्हालाही चमचमीत पदार्थ करण्याची इच्छा होते. तुमच्या मधला मास्टर शेफ जागा होतो. तसेच तुम्हाला देखील चटपटीत खाण्याचे मोह होतो. पण कधीतरी फूड रील मधला पदार्थ खाता आला नाही. तर मनात अपुरेपणाची भावना निमार्ण होते. मनाला वाईट वाटते.

वजन वाढते

सतत फूड रील्स पाहत राहिल्याने वजन वाढते. कारण सतत खमंग पदार्थ पाहिल्यामुळे भूक वाढते. ज्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ लागता. परिणामी तुमच्या कॅलरीज वाढून तुमचे वजन वाढते. फूड रील्स सतत खाण्याला प्रोत्साहन करते. फूड रील्समुळे निर्माण होणाऱ्या खाण्याच्या मोहामुळे तुम्हाला वास्तविक भुकेचा संकेत कळत नाही. यामुळे जीवनशैलीवर वाईट परिणाम होतो.

Mental Health
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा; झटपट व्हाल बारीक

सोशल मीडिया काळ

सोशल मीडियाच्या काळात जेवणाचे व्हिडिओ टाळणे हे आव्हानात्मक आहे. तरीपण चांगल्या आरोग्यासाठी हे करणे महत्वाचे राहील. तुमच्या व्हिडीओ पाहण्यावर एक मर्यादित ठेवा. संतुलित खाणे आणि निरोगी अन्नाला प्रोत्साहन करा. व्हिडीओमध्ये जे दिसत आहे त्याचे अनुकरण करण्यापेक्षा भुकेचे संकेत ओळखा. नियमित शारीरिक हालचाली करा. फूड रील्स पाहून खाण्याच्या मोहाला आवर घाला.

सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर टाळा

फूड रील्सचा पाहिल्याने तुमच्या खाण्याच्या सवयींवर काय परिणाम होतो हे जाणून घ्या. सोशल मीडियावरील फूड रील्सचा तुमच्या खाण्यावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. त्सयामुळे ते पाहणे वेळीच थांबवा. आठवड्यातून किमान एकदा तरी सोशल मीडियाचा वापर टाळा. रील्स पाहण्याची सवय लागू नये म्हणून झोपण्याच्या एक तास आधी स्क्रीन टाळण्याचे लक्षात ठेवा. अधिक वेळ तुमच्या कुटुंबासोबत घालवा.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Mental Health
Weightloss during Monsoon: ना डायट.. ना व्यायाम; पावसाळ्यात सोप्या पद्धतीनं वजन कमी करण्याचे उपाय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com