Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा; झटपट व्हाल बारीक

Foods to Help You Lose Weight : वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात काकडीचा समावेश करावा. यामध्ये जास्तप्रमाणात पाणी असते. काकडीचे सेवन केल्याने पोट लगेच भरते.
Foods to Help You Lose Weight
Weight Loss TipsSaam TV
Published On

वजन कसं वाढलं हे कुणालाच मसजत नाही. मात्र तेच वजन कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला मोठी कसरत घ्यावी लागते. वेट लॉससाठी अनेक हेल्थ एक्सपर्ट कमी कॅलरीचे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. कॅलरी कमी असलेले पदार्थ खाल्ल्याने आपलं वजन वाढत नाही, शिवाय पोटही भरतं. त्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. तुम्हीही आहारात अशा पदार्थांचा समावेश करू शकता. याने वजन झटपट कमी होतं.

Foods to Help You Lose Weight
Health Tips: तुम्हाला कमी वेळात वजन कमी करायचयं? मग हे 4 उपाय ठरतात प्रभावी! जाणून घ्या

काकडी

वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात काकडीचा समावेश करावा. यामध्ये जास्तप्रमाणात पाणी असते. काकडीचे सेवन केल्याने पोट लगेच भरते. काकडीमध्ये फायबर देखील असते. त्यामुळे वर्कआउटसोबत आहारात काकडी असेल तर वजन भरपूर कमी होतं. उन्हाळ्यात तसेच अन्य ऋतूंमध्ये देखील काकडीचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. डिहायड्रेशनपासून आपला बचाव होतो. वजनही कमी होते

सफरचंद

आरोग्य तज्ञांच्या मते सफरचंदाचा उष्मांक फार कमी असतो. एक कप म्हणजे १०९ ग्रॅम सफरचंदमध्ये ६२ कॅलरीचा समावेश असतो. तर ३ ग्रॅम इतकं फायबर सुद्धा असतं. सफरचंदमध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमीन असते. विविध जीवनसत्व असल्याने सफरचंद पोषक तत्वांचं मोठं भांडार आहे. या फळात तुम्हाला फ्लेव्हॉनॉइड, क्वेर्सेटीन आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक तत्व मिळतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा मोठी मदत होते.

ब्रोकोली

ब्रोकोली पचण्यासाठी हलकी असते. शिवाय त्यातही उत्तम पोषकतत्व आहेत. एक कप ब्रोकोली खाल्ल्याने आपल्याला तब्बल ५४ कॅलरीज मिळतात. यात व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सिडंट सारखे घटक सुद्धा असतात. ब्रोकोली डायबेटीजच्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा फायदेशीर आहे.

कोमट पाणी आणि मध

वजन कमी करण्यासाठी तुम्ही बरीच कसरत आणि मेहनत घेत असाल तर कोमट पाण्यात मध मिक्स करून प्या. मध आणि कोमट पाणी आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते. त्यामुळे शरीराला व्यायामासह या पाण्याची देखील वजन कमी करण्यासाठी मदत होते.

उकडलेलं अन्न

वजन कमी करताना कायम तेलकट पदार्थ खाणे टाळावे. तेलकट पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होण्याऐवजी आणखी जास्त वाढते. त्यामुळे नाश्त्यासाठी दूध, उकडलेली अंडी, उकडलेले कडधान्य असे पदार्थ तु्म्ही खाऊ शकता. तसेच यामध्ये विविध फळांचा समावेश करू शकता. त्याने भूक कमी लागते तसेच शरीराला योग्य प्रोटिन आणि फायबर सुद्धा मिळते.

टीप : ही सामान्य माहिती आहे. तुम्ही वजन कमी करण्यासाठी आरोग्य तज्ञांचा देखील सल्ला घेऊ शकता.

Foods to Help You Lose Weight
Lose Belly Fat : पाणी पिण्याची वेळ आणि प्रमाण जाणून घ्या; 5 दिवसांत वाढलेली ढेरी गायब होईल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com