Health Tips: तुम्हाला कमी वेळात वजन कमी करायचयं? मग हे 4 उपाय ठरतात प्रभावी! जाणून घ्या

Weight Loss Tips: सध्याच्या काळातील सततच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि नागरिकांनी रोजच्या आहारात केलेल्या बदलामुळे वजन वाढते. शिवाय जास्त मानसिक ताण घेतल्याने देखील वजन वाढण्याची शक्यता असते.
Weight Loss Tips
Health TipsYandex
Published On

सध्याच्या काळातील सततच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि नागरिकांनी रोजच्या आहारात केलेल्या बदलामुळे वजन वाढते. शिवाय जास्त मानसिक ताण घेतल्याने देखील वजन वाढण्याची शक्यता असते. मात्र धावपळीच्या जीवनशैलीत वजन कमी कसे करायचे हा प्रत्येकासमोर पडलेला एक प्रश्न असतो. मात्र स्वयंपाक घरातील उपलब्ध असणाऱ्या लसणाच्या साहाय्याने कमी वेळात वजन कमी करणे शक्य आहे. मात्र सर्वात आधी जाणून घेऊयात की वजन कशामुळे वाढते.

Weight Loss Tips
Healthy Lifestyle: रात्री उशीरा जेवल्याने आरोग्य सुधारतं की बिघडतं? जाणून घ्या

आपल्यापैंकी असा नेहमी प्रश्न पडत असतो की, माझ वजन का वाढतंय, जास्त जेवण करत नाही तसेच बाहेरचे फास्ट(Fast) फूडही देखील खात नाही. मग वजन का वाढत असेल असे अनेकांना अनेक प्रश्न नेहमी भेडसावत असतात.परंतु वजन वाढण्याची बरीच कारणे आहेत.

1.थायरॉइड

थायरॉइड हे हार्मोनच्या कार्यांपैकी वजन नियंत्रणात ठेवण्याचे काम करते.परंतु जर तुम्हाला थायरॉइड असेल तर, थायरॉइट हार्मोनच्या विकारात मंदावतो.त्यामुळे वजन वाढू शकते.त्यामुळे जर थायरॉइड असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती औषध घेतल्यास वजन नियंत्रणात राहते.

2. ताणतणाव

प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ताण असतोच,परंतु जास्त ताण घेणे हे शरीरासाठी आणि आपल्या आरोग्याठी घातक असू शकतं,जास्त ताण घेतल्याने आपले वजन देखील वाढू शकते.

३. अपुरी झोप

पुरेशी झोप न घेतल्याने देखील वजन वाढू शकते. त्यामुळे पुरेशी झोप,योग्य आहार,रोज व्यायाम करणे हे आपल्या शरीरासाठी फायदेमंद आहे.

झटपट वजन कमी कसं करायचं?

1. सर्वात आधी सकाळी लवकर उठल्यावर 2 लसूनच्या पाकल्या कच्च्या चावून खाव्या,नंतर त्यावर एक ग्लास लिंबू पाणी प्यावे.असं केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

२. रोज पपईचे सेवन केल्याने देखील वजन कमी करण्यास देखील मदत होते.

3. दही देखील शरीरासाठी गुणकारी असते.जेवणात रोज दह्याचे सेवन केल्याने देखील चरबी कमी होण्यास मदत होते.

4. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घेवून,रोज 3 ग्रॅम चूर्ण ताकात टाकून त्याचे सेवन केल्याने देखील बाहेर आलेले पोट कमी होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Weight Loss Tips
Lifestyle For Slow Ageing : तिशीच्यानंतर 'या' गोष्टींच सेवन करणे टाळा, अन्यथा येईल अकाली वृद्धतत्व

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com