पावसाळ्यात फिट राहणे आव्हानात्मक आहे. जीममध्ये जाणाऱ्यांना खाण्यावर कट्रोल करावे लागते. पावसाळ्यात खाण्यावर कट्रोल करणे हे फार कठीण जाते. पावसात भिजल्यावर चहा आणि भजीच्या क्रेविंगमुळे आपल्या डायटवर परिणाम होतो. त्याचबरोबर पावसाळ्यात जीमला जाणं बऱ्यापैकी लोक टाळतात, आणि जंक फूड खाणं पसंत करतात. त्यामुळं त्यांच्या आरोग्यावर कधी-कधी विपरीत परिणाम होताना दिसतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जीममध्ये न जाताही एकदम फीट राहू शकतात. तुमच्या घरात अश्या काही गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्हाला जीमलाही जावं लागणार नाही आणि तुमचा व्यायामही चुकणार नाही. हे घरगुती उपाय केले तर तुम्ही एकदम फीट राहू शकतात
1) घरातील कामे करा :-
तुम्हाला जर घरी बसून फीट राहायचं असेल तर घरातील छोटे-मोटे काम करण्याचा प्रयत्न करा. कपडे धुणे, वाकून फरशी पुसणे यामुळे तुमचा व्यायाम होऊ शकतो आणि घरातील कामही पुर्ण होते
2) भिंत, खुर्ची, टेबलचा आधार घेत व्यायाम करा :-
भिंतीचा वापर करून तुम्ही पुशअप्स एक्सरसाईज करू शकतात. तसंच खुर्ची, टेबलच्या मदतीनं तुम्ही स्ट्रेटिंग करू शकतात. तसंच पाय, थाईज, पाठ, मान यांचा व्यायाम तुम्ही खुर्चीच्या मतदीनं करू शकतात.
3) बागेतील कामे करा :-
तुम्हाला जर पावसाळ्यात जीमला जायचं नसेल तर तुम्ही बागेतील कामे करू शकतात. यामुळे तुमच्या कॅलरी बर्न व्हायला मदत होते. तसंच नैसर्गिक हवा मिळवल्याने आरोग्यही निरोगी राहते.
4) नृत्याची आवड निर्माण करा :-
घरामध्ये आवडीचं गाणं लावून नृत्य करा ज्यामुळे तुम्हाला घाम येईल आणि तुमच्या कॅलरी बर्न व्हायला मदत मिळेत. बेली डान्स, झुंबा डान्स यासारख्या नृत्य प्रकार शिकण्याचा प्रयत्न करा.
5) योगासने करा :-
तुम्हाला जर फीट राहयचं असेल तर योगासने करणे हा उत्तम पर्याय आहे. रोज तुम्ही 10 सुर्यनमस्कार जरी काढले तर तुम्ही एकदम फीट राहू शकतात. सोप्या सोप्या योगासनाद्वारे कॅलरी बर्न व्हायला मदत मिळते.
मिळाले ना, जीममध्ये न जाता फीट राहण्याचे एवढे पर्याय. त्यामुळं घराच्या घरी हे उपाय करा आणि फीट रहा.
डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.