Push-ups on Car Viral Video: धावत्या कारच्या टपावर मारले पुशअप्स; Video Viral होताच उतरली मस्ती

Viral Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या तरुणाने चक्क कारवर पुशअप्स केलेत.
Push-ups on Car Viral Video
Push-ups on Car Viral VideoSaam TV
Published On

Car Pushup Video: सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्याची तरुण पिढी इतकी बेफाम झाली आहे की, आपल्या प्रसिद्धीसाठी ते काहीही करण्यास तयार होतात. काही तरुण कार, दुचाकी यांवर किंवा लोकल ट्रेनमध्ये अतरंगी स्टंट करतात. अशा तरुणांचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. (Latest Marathi News)

सध्या देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हुल्लडबाजी करणं पाच तरुणांच्या अंगाशी आलं आहे. अनेक चारचाकी गाड्यांवर सनरोप लावण्यात येतात. तेथे लहान मुलं अथवा इतर कोणीही मस्त गार वारा अंगावर घेत प्रवास करतात. अशात आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या तरुणाने चक्क कारवर पुशअप्स केलेत.

Push-ups on Car Viral Video
Bride Chewing Gutkha Viral Video: बोलो जुबां केसरी! गुटखा खाण्याची तलब आवरेना; नवरीने वरातीतच...

सोशल मीडिया एक असं माध्यम झालं आहे जीथे अगदी एका रात्रीत प्रसिद्धी मिळवता येते. त्यामुळे तरुण मंडळी आपला व्हिडिओ जास्त लोकांनी पाहावा. तो व्हायरल व्हावा आणि आपल्याला प्रसिद्धी मिळावी याचा विचार करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाच तरुण एका कारमध्ये आहेत. यातील एक जण टपावर पुशअप्स मारत आहे. तर बाकिचे त्याचे हात पाय पकडून खिडकीत उभे आहेत. मागून येणाऱ्या कारमधील व्यक्तींनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे.

प्रदीप दुबे यांनी आपल्या इंस्टाअकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी पोलिसांनाही हा व्हिडिओ टॅग केला. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी या हुल्लडबाज तरुणांचा शोध घेतला आहे. सध्या हे ५ ही तरुण पोलिसांच्या अटकेत असून त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंडही कापण्यात आला आहे.

Push-ups on Car Viral Video
Girls Fighting Video: केस पकडले अन् खाली आपटून लाथा घातल्या; भररस्त्यात तरुणींमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com