Anger Effects : सतत चिडचिड होतेय, रागही येतो? मग करा 'हे' उपाय, डोकं राहील शांत अन् मन प्रसन्न

Irritation Of Mental Health : सध्या प्रत्येक व्यक्तीची जीवन पद्धती बदलली आहे. त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या स्वभावर होत असतो.त्यातील एक समस्याही सतत येणारा राग.
Irritation Of Mental Health
Anger EffectsSaam Tv
Published On

एखाद्या गोष्टीवर राग येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. राग येणे ही एक नकारात्मक भावना आहे. मात्र हाच राग नियंत्रणाबाहेर गेल्यावर सगळे काही उध्वस्त करून टाकतो. राग हा प्रत्येक व्यक्तीचा सर्वांत मोठा शत्रू आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी रागावर नियंत्रण मिळवणे खूप महत्वाचे आहे.

Irritation Of Mental Health
Monsoon Health Care : पावसात भिजण्याचेही आहेत फायदे! वाचा तज्ज्ञांचे मत

रागाचा परिणाम थेट तुमच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर होतो. जास्त राग आल्यास ब्रेन स्ट्रोकची शक्यता जास्त असते. तसेच रक्तदाब (blood-pressure)वाढणे, ताण येणे, पचनशक्ती कमकुवत होणे, अशा अनेक समस्या तुमच्या क्रोधामुळे निर्माण होतात. झोप न लागणे आणि हार्मोनल बदलांसह अनेक घटक राग येण्यास कारणीभूत ठरू शकतात.

राग येण्याची अनेक कारणे आहेत. मनासारखे नाही झाल्यास राग येतो. तसेच खूप ताण असेल तर चिडचिड होणे आणि राग येणे स्वाभाविक आहे. खूप जास्त राग (Anger)हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. त्यामुळे आपल्या रागावर नियंत्रण करणे गरजेचे आहे, अन्यथा हा राग इतरांसाठीही अडचणी निर्माण करण्याचे कारण ठरू शकतो. त्यामुळे सततच्या येणाऱ्या रागावर नियंत्रण मिळवण्याच्या काही सोप्या पद्धती आज जाणून घेऊयात...

'हे' उपाय करा आणि रागापासून मुक्ती मिळवा

1. मेडिटेशन करणे राग नियंत्रणात आणण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. मेडिटेशन केल्याने मानसिक क्षमता वाढण्यासोबतच मन शांतही राहते. तसेच राग आल्‍यावर त्‍या क्षणी प्रतिक्रिया देणे टाळा. तुमच्या रागामुळे इतर व्यक्तींना दुखवू नका.

2. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा डोळे(Eyes) बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. यामुळे तुम्ही लगेच शांत व्हाल. राग आल्यास आवडती गाणी ऐका. त्यामुळे तुमचा मुड रिफ्रेश होऊन मनाला शांती मिळेल.

3. स्वत:सोबत वेळ घालवणे खूप गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तिशी भांडण झाल्यास एकटे राहण्यासाठी थोडा वेळ काढणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल आणि विचार करायला वेळ मिळेल.

4. आपल्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या घटना आठवा किंवा रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही हास्य योग करू शकता.

5. सर्वात महत्वाचे म्हणजे सतत राग आल्यास रागाची कारणे शोधा. एकाच व्यक्तीमुळे तुम्हाला सातत्याने राग येत असल्याने त्या व्यक्तीला पूर्णपणे दुर्लक्षित करा.

6. ज्या कामातून तुम्हाला आनंद (happiness)मिळतो, ते काम करा. त्यामुळे राग शांत होतो. आपल्या समस्या जवळच्या व्यक्तीकडे बोला, ज्यामुळे तुमच्या राग येण्याची कारणे नाहीशी होतील.

Irritation Of Mental Health
Health Tips : तुम्हाला सकाळी उठल्यावर लगेच भूक लागते का? असू शकतो मधुमेहाचा धोका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com