Igatpuri Monsoon Tourism : पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्यायचायं? इगतपुरीमधील 'या' ठिकाणी भेट द्या

Igatpuri Tourist Places : पावसाळा सुरु होऊन अनेक महीने झाले आहेत. अनेकजण प्रसिद्ध ठिकाणी फिरायचा प्लान बनवत आहेत. अनेक ठिकाणांपैकी प्रसिद्ध असे इगतपुरी हे ठिकाण आहे.
Igatpuri Tourist Places
Igatpuri Monsoon TourismSaam Tv
Published On

पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या टेकड्यांवर बांधलेले इगतपुरी हे महाराष्ट्रातील एक हिल स्टेशन आहे. या परिसराच्या सौंदर्याची प्रशंसा करणार तितकी कमी आहे. इगतपुरीच्या सुखद नैसर्गिक पर्यटनाची लोकप्रियता हळूहळू जगभरात पसरतेय. महाराष्ट्रातील हे हिल स्टेशन निसर्गप्रेमींसाठी आणि पावसाळ्याच्या रिमझिम पावसात पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी उत्तम ठिकाण आहे.

Igatpuri Tourist Places
Monsoons Tourism: पावसाळ्यात मुंबईत फिरायचं आहे? 'या' ठिकाणांना आवश्य भेट द्या

निसर्गाच्या सानिध्यात काही काळ एकांतात घालवण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना इगतपुरीत आल्यावर नक्कीच मजा वाटेल ही खात्री आहे. पर्यटकांसाठी इगतपुरीत अनेक किल्ले, सुंदर पर्वत रांगा, फेसाळणारे धबधबे, मंदिरे(Temples) निर्मळ जंगले सर्व काही पहायला मिळते. इगतपुरीतील काही डोळ्यांची पारणे फेडणारी ठिकाणे पाहूया.

त्रिंगलवाडी किल्ला

त्रिंगलवाडी किल्ला जमिनीपासून ३००० मीटर उंचीवर आहे. या किल्ल्यावरून कोकण-नाशिक महामार्ग अतिशय सुरेख दिसतो. त्रिंगलवाडी या किल्ल्याचे बांधकाम दहाव्या शतकातील आहे. हा किल्ला अशा पर्यटकांचा विशेष आवडता आहे ज्यांना पर्वतांमध्ये गिर्यारोहण किंवा ट्रेकिंगची आवड असते. इगतपुरीत येणाऱ्या पर्यटकांसाठी हा किल्ला एक आकर्षण आहे. हा त्रिंगलवाडी किल्ला पगडीसारखा दिसतो. शिवाय या किल्ल्याजवळ त्रिंगलवाडी तलाव(lake) देखिल आहे.

विहिगाव धबधबा

विशेषतः पावसाळ्यात विहिगाव धबधबा हे फार सुंदर पर्यटन स्थळ आहे. येथे वर्षभर पाणी पडत असले तरी पावसाळ्यात आजूबाजूचा परिसर पूर्णपणे हिरवाईने नटलेला असतो. त्यामुळे हे ठिकाण अधिक सुंदर दिसते. हा धबधबा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या धबधब्याच्या आजूबाजूला उंच पर्वत आणि जंगले देखिल आहेत. सुमारे १२० फुटांवरून पडणारे या धबधब्याचे पाणी आणि त्या पाण्याचा आवाज शांत जंगलात एक सुखद अनुभव देतो.

कळसूबाई शिखर

कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत आहे जे लांबूनच दिसते. स्थानिक लोक कळसूबाई शिखराला ‘एव्हरेस्टचे (everest)शिखर’ म्हणतात. या शिखरावर जाण्यासाठी असणारी चढाई खूप अवघड आहे आणि प्रत्येक पर्यटकाला ते शक्य होईलच असे नाही. अनुभवी गिर्यारोहकांना देखिल कळसूबाई शिखरावर सहज पोहोचता येत नाही.

विपश्यना केंद्र

इगतपुरीच्या प्रवेशद्वारावर गोल्डन पॅगोडा हे एक प्रतिष्ठित ठिकाण आहे. हे केंद्र देश-विदेशातील पर्यटकांना खुप आकर्षित (Attract)करते. या विपश्यना केंद्राला भेट देण्याची वेळ सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० अशी आहे. धम्म गिरी देखील इगतपुरी शहरात वसलेले आहे, ज्याचे अंतर मुंबईपासून सुमारे १३७ किलोमीटर आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकावरून धम्मगिरीला जाण्यासाठी ऑटो रिक्षा, टॅक्सी, कॅब सहज उपलब्ध आहेत.

भावली धरण

५०९० फूट लांबीमुळे भावली धरण (dam)पर्यटकांना विशेष आकर्षित करते. या ठिकाणी गेल्यावर पर्यटकांना जी शांतता मिळते ती शब्दात मांडता येणारी नाही. भावली धरणाच्या आजूबाजूला अनेक पिकनिक स्पॉट्स आहेत. जवळच बांधलेले धरण आहे जे त्याच्या सौंदर्यात भर घालते. भावली धरणावर जाण्यासाठी सुमारे १०० पायऱ्या चढून जावे लागते.हे धरण नाशिकपासून 50 किलोमीटर आणि मुंबईपासून १२०किलोमीटर अंतरावर आहे.

भातसा नदीचे खोरे

भातसा नदीचे खोरे भव्य खडकांनी बनवलेले आहे. या दरीत आजूबाजूला हिरवाई दिसते. पर्यटकांना येथे जाण्यासाठी इगतपुरी रेल्वे स्थानकावरून ऑटो आणि टॅक्सी मिळू शकतात. येथून सुमारे 20 ते 25 मिनिटांत भातसा नदीपर्यंत पोहोचता येते. उंच ठिकाणाहून पाहिल्यावर या दरीचे दृश्य खूपच चित्तथरारक दिसते.

सांधण दरी

दोन पर्वत रांगांमधील अंतरामुळे निर्माण झालेल्या सांधण व्हॅलीची स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. हे ठिकाण सर्व हंगामांसाठी उत्तम आहे. टेन्ट स्टे साठी याठिकाणी अनेक जण येत असतात. इथपर्यंत पोहोचणे प्रत्येकाला शक्य नाही. केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि मजबूत पर्यटक ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे तेच या सांधण व्हॅलीमध्ये जास्त अंतर गाठू शकतात. इगतपुरीपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर सांधण व्हॅली आहे. रस्त्याने इथपर्यंत पोहोचायला तीन तास लागतात.

कसारा घाट

इगतपुरीचा कसारा घाट (ghat)चारही बाजूंनी डोंगर आणि जंगलांनी वेढलेला आहे आणि हे ठिकाण साहसी पर्यटकांना आवडते. येथे एक सुंदर धबधबा आहे ज्यावर डोंगरातून थोडेसे चालत जाता येते. येथील टेकड्या धुक्याच्या पांढऱ्या चादरीत लपेटलेल्या दिसतात. कसारा व्हॅलीमध्ये जाण्यासाठी, इगतपुरीहून बसेस धावतात ज्यास सुमारे 30 मिनिटे लागतात. इगतपुरीपासून येथील अंतर सुमारे 20 किलोमीटर आहे.

महाराष्ट्रातील हिल स्टेशन इगतपुरीला भेट देण्यासाठी जुलै ते फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी सर्वात बेस्ट आहे. या ऋतूत रिमझिम पावसामुळे आजूबाजूच्या डोंगरांवर हिरवळ पाहायला मिळते, त्यामुळे एक वेगळाच आनंद मिळतो. पावसामुळे डोंगरातून धबधब्याच्या रूपात पाणी खाली कोसळते ज्यामुळे या हिल स्टेशनच्या सौंदर्यात भर पडते. तुम्ही देखिल फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर यंदा इगतपुरीला नक्की भेट द्या.

Edited By: Tanvi Pol

Igatpuri Tourist Places
Maharashtra New Tourism Policy: महाराष्ट्रात नवं पर्यटन धोरण, १ लाख रोजगार निर्मितीची शक्यता; काय काय असणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com