Maharashtra New Tourism Policy: महाराष्ट्रात नवं पर्यटन धोरण, १ लाख रोजगार निर्मितीची शक्यता; काय काय असणार?

Maharashtra New Tourism Policy Proposal In Cabinet Meeting: राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत आज नवीन पर्यटन धोरणास मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
Maharashtra New Tourism Policy: महाराष्ट्रात नवं पर्यटन धोरण, १ लाख रोजगार निर्मितीची शक्यता; काय काय असणार?
Maharashtra Tourism Policy Saam TV
Published On

गणेश कवडे साम टीव्ही, मुंबई

राज्याच्या नवीन पर्यटन धोरणास आज मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. फाईव्ह स्टार हॉटेल, टुरिस्ट कंपन्या, ट्रॅव्हल एजंट यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्रात भरीव गुंतवणूक होण्यासाठी नवीन पर्यटन धोरण राबवलं जाणार आहे. सर्व राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करून नवं धोरण तयार केलं आहे. या नवीन धोरणामुळे सुमारे १ लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे.

राज्यात नवे पर्यटन धोरण

राज्यात नवे पर्यटन धोरण आता जारी करण्यात येणार (New Tourism Policy) आहे. महाराष्ट्रामध्ये पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. राज्याला ७२० लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आता पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी राज्यात स्वतंत्र धोरण तयार केलं जात आहे. मोदी सरकारच्या (Maharashtra Cabinet)३.० धोरणात पहिल्या १०० दिवसांत केलेली घोषणा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पर्यटनामुळे रोजगार उपलब्ध होवून अर्थव्यवस्थेला वेग प्राप्त होतो.

पर्यटन स्थळांचा विकास

राज्यात सध्या मोजकीच पर्यटनस्थळे प्रकाशझोतामध्ये आहेत. पर्यटनस्थळांचे सर्वेक्षण, संरक्षण आणि सुविधा यांचा जिल्हानिहाय मास्टर प्लान देखील तयार केला जाण्याची शक्यता आहे. आज मंत्रीमंडळ बैठकीत नवीन पर्यटन धोरणास मान्यता मिळाल्यास (Maharashtra Cabinet Meeting) १ लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे. फाईव्ह स्टार हॉटेल, टुरिस्ट कंपन्या, ट्रॅव्हल एजंट देखील अनुदान मिळणार आहे. त्यामुळे या उद्योगधंद्यांचा विकास झपाट्याने होण्याची दाट शक्यता आहे.

Maharashtra New Tourism Policy: महाराष्ट्रात नवं पर्यटन धोरण, १ लाख रोजगार निर्मितीची शक्यता; काय काय असणार?
Matheran Tourism : गर्द हिरवीगार झाडी अन् बर्फाळ धबधबे; 'या' पावसाळ्यात करा मुंबई टू माथेरान ट्रिप, फक्त २५० रुपयांत

१ लाख रोजगार निर्मितीची शक्यता

महाराष्ट्रात भरीव गुंतवणूक होण्यासाठी पर्यटनाचा विकास होणं गरजेचं (New Tourism Policy Latest News) आहे. मोदी सरकारच्या ३.० धोरणात पहिल्या १०० दिवसांत याविषयी घोषणा केली गेली होती. आज या धोरणास मान्यता मिळाल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. राज्यात पर्यटनासाठी पोषक वातावरणनिर्मिती झाली तर भांडवल गुंतवणूक देखील वाढणार आहे, यासाठी सरकार देखील मदत करणार आहे.

Maharashtra New Tourism Policy: महाराष्ट्रात नवं पर्यटन धोरण, १ लाख रोजगार निर्मितीची शक्यता; काय काय असणार?
Lonavala Tourism New Rule : लोणावळ्यात पर्यटनास जाणार आहात? जिल्हाधिका-यांनी दिली महत्वपूर्ण माहिती (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com