पावसाळा सुरु झाल्याने सध्या अनेक व्यक्ती विविध ठिकाणी फिरण्याचा प्लान करत आहेत. फिरायला जायचं म्हटलं की, सर्वात आधी पावसाळ्यात डोळ्यांसमोर पांढरेशुभ्र धबधबे येतात. अशात तुम्ही जर माथेरानला फिरण्याचा प्लान करत असला तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे.
हिरवीगर्द झाडी
माथेरानला गेल्यावर तेथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तुम्हाला नागमोडी वळण, डोंगर दरी आणि धबधबे पाहायला मिळतील. जर तुम्ही बाय रोड येथे आलात तर माथेरान लागल्याबरोबर तुम्हाला अनेक सेल्फी पॉइंट मिळतील.
निसर्गाचं सौंदर्य
उंच डोंगराळ भागात हे गाव वसलं आहे. त्यामुळे येथून आतमध्ये गेल्यावर डोंगराच्या दिशेने वरती जाताना उन्हाळ्यात सुद्धा अचानक आभाळ येतं. येथे सर्वत्र लाल रंगाची माती आहे. तसेच येथे विविध प्रकारचे पॉइंट्स देखील आहेत.
मिनी ट्रेन
माथेरानमध्ये असलेल्या मिनी ट्रेनमधून तुम्ही येथे प्रवास करू शकता. त्यासाठी तुम्हाला माथेरान स्टेशनवरून मिनी ट्रेन मिळेल. या ट्रेनमधून निसर्गाचा अस्वाद आणि विविध पॉइंट्सला देखील भेट देता येईल.
मुंबई ते माथेरान २५० रुपयांत
त्यासाठी दादर किंवा सेंट्रलच्या कोणत्याही स्थानकातून कर्जत ट्रेन पकडा. त्यानंतर नेरळ या रेल्वे स्थानकात तुम्हाला उतरावे लागेल. त्यानंतर येथे काही बससेवा आहे. याचे तिकीट प्रत्येक व्यक्तीसाठी १०० रुपये आहे. येथून तुम्ही बसमधून माथेरानला पोहचाल. त्यानंतर एन्ट्री गेटला तुम्हाला ५० रुपयांचं तिकीट घ्यावं लागले. येथे अमन लॉड्जवर पोहचल्यावर तुम्हाला मिनी ट्रेनचं तिकीट घ्यावं लागेल. याचं कितीट ५५ रुपये आहे. अशा पद्धातीने जर तुमचं बजेट कमी असेल तरी देखील तुम्ही मुंबई ते माथेरान असा प्रवास करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.