Matheran Mini Train: प्रवाशांसाठी खुशखबर! माथेरानची राणी पुन्हा धावणार; नेरळ- माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू

Neral- Matheran Mini Train: नेरळ-माथेरान टॉय ट्रेनबाबतीत मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Neral- Matheran Mini Train
Neral- Matheran Mini TrainSaamtv
Published On

सचिन कदम, प्रतिनिधी

Matheran Mini Train Update:

राज्यात थंडी वाढताना दिसत आहे, तसेच दिवाळीचा सणही तोंडावर आलायं. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत तुम्हीही हिल स्टेशनला भेट देण्याचा बेत आखत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. नेरळ-माथेरान टॉय ट्रेनबाबतीत मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. माथेरान मिनीट्रेन सेवा ४ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे. या निर्णयामुळे माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांचा प्रवास आणखी सोपा होणार आहे.

माथेरानला (Matheran) जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पावसाळी हंगामासाठी बंद असलेली पर्यंटकांची लाडकी माथेरानची मिनी ट्रेन आजपासून सुरू झाली आहे. आज सकाळी या गाडीला नेरळ स्टेशन इथे हिरवा झेंडा दाखविण्यात आला. पहिल्याच दिवशी या मिनीट्रेनला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभला. सध्या या गाडीच्‍या दिवसाला 2 फेऱ्या होणार आहेत.

सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी आणि १० वाजून २५ मिनिटांनी नेरळ येथून गाडी सुटेल तर माथेरान येथून दुपारी पावणे तीन आणि संध्याकाळी ४ वाजता गाडी सुटणार आहे. सहा बोगी असलेल्‍या पॅसेंजर ट्रेनमध्‍ये व्दितीय श्रेणीच्‍या 3, प्रथम श्रेणीची एक आणि 2 लगेज बोगीची सुविधा देण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Neral- Matheran Mini Train
Maratha Aarakshan: मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; CM शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

दरवर्षी साधारण 15 ऑक्‍टोबरला सुरू होणारी ही ट्रेन यंदा उशिराने सुरू झाली. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच या माथेरानच्या राणीचे आकर्षण असते. या गाडी बरोबरच माथेरानच्या हिवाळी पर्यटन हंगामाला देखील सुरुवात झाली आहे. दरम्यान, रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार जून ते ऑगस्ट दरम्यान एक लाख १३ हजार ८८७ प्रवाशांनी या मिनी ट्रेनमधून प्रवास केला आहे. (Latest Marathi News)

Neral- Matheran Mini Train
Mumbai Mega Block: प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com