कोमल दामुद्रे
भारतातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन हे महाराष्ट्रातील असून येथील नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी परदेशातून लोक येथे येतात.
महाराष्ट्रातील सातरा जिल्ह्यात नटलेली वनराई ही पर्यटकांना भूरळ घालते.
साताऱ्यातील महाबळेश्वर प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते.
महाबळेश्वरचे शिवमंदिरही खूप लोकप्रिय आहे. हे मंदिर महाबळेश्वरपासून ६७ किलोमीटर अंतरावर आहे.
महाबळेश्वरच्या उंचीवर असलेल्या प्रतापगड किल्ल्यावरही लोकांची गर्दी झालेली दिसते.मराठा साम्राज्याच्या काळातील हा किल्ला वारसा म्हणून ओळखला जातो.
महाबळेश्वरचे सर्वात प्रसिद्ध व्ह्यू पॉईंट, आर्थर सीटला क्वीन ऑफ पॉइंट म्हणूनही ओळखले जाते. डाव्या बाजूला सावित्री नदी वाहते आणि उजव्या बाजूला ब्रह्मा अरण्य वन.
महाबळेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर एक तलावही आहे, जो वेणा तलाव म्हणून ओळखला जातो. बोटींगचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे येतात.