महाशिवरात्री 2024 : हर हर महादेव... शंभाे शिव शंकरा घाेषाने दुमदुमली राज्यातील मंदिरे

Mahashivratri 2024 Marathi News : महाशिवरात्रीला जेजुरी गडावर त्रैलोक्य शिवलिंग दर्शनाची मोठी पर्वणी असल्याने हजारो भाविकांची गर्दी झाली आहे.
mahashivratri celebration at jejuri gad
mahashivratri celebration at jejuri gadsaam tv
Published On

- मंगेश कचरे / विनाेज जिरे / विनायक वंजारे / सचिन बनसाेडे / सागर निकवाडे

Mahashivratri News :

महाशिवरात्र निमित्त अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचे लोकदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरीगडाच्या (jejuri gad) मंदिरात आणि शिखरावर असणाऱ्या स्वर्गलोकी, भूलोकी व पाताळलोकी (त्रैलोक्य) या शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची गर्दी आहे. या बराेबरच बीड (beed), सिंधुदूर्ग (sindhudurg), नंदुरबार (nandurbar), नाशिक (nashik) आदी जिल्ह्यात भाविकांची महादेवाच्या मंदिरात गर्दी उसळली आहे. (Maharashtra News)

जेजुरीगडावर येळकोट येळकोट जयमल्हार, सदानंदाचा येळकोटचा, हर हर महादेवाचा जयघोषाने वातावरण मल्हारमय झाले आहे. जेजुरीला दक्षिणेकडील काशी मानले जाते. कैलास पर्वता नंतर जेजुरी गडावर शंकर व पार्वतीचे एकत्रित स्वयंभू शिवलिंग पाहण्यास मिळते. त्यामुळे महाशिवरात्री यात्रेला येथे वेगळे धार्मिक महत्व आहे.

mahashivratri celebration at jejuri gad
Maharashtra Police Bharti 2024 : पोलिस भरतीत वयोमर्यादा वाढवून द्या : संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटना

शिवलिंग दर्शनासाठी खूले

जेजुरी गडाच्या मुख्य मंदिरावरील शिखरात असणारे शिवलिंग हे स्वर्गलोकी शिवलिंग मानले जाते. तर गडावरील मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंग हे भूलोकी शिवलिंग आणि गाभाऱ्यातील मुख्य मंदिरा शेजारी असणाऱ्या गुप्त मंदिरातील तळ घरात असणारे शिवलिंग पातालोकी शिवलिंग मानले जाते. मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग हे दर्शनासाठी रोज खुले असते तर मंदिराच्या शिखरावरील व मुख्य मंदिरातील तळ घरातील शिवलिंग हे केवळ वर्षातून एकदा महाशिवरात्री दिवशी दर्शनासाठी उघडले जाते.

महाशिवरात्रीला जेजुरी गडावर त्रैलोक्य शिवलिंग दर्शनाची मोठी पर्वणी असल्याने हजारो भाविक हा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात.

कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीच्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. रात्री बारानंतर महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविक दर्शन रांगेत लागले होते. यादरम्यान रात्री उशिरा कृषिमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी देखील प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. भाविकांची येणारी संख्या लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच पोलिस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. दरम्यान भाविकांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार वेंकटेश मुंडे यांनी दिली.

mahashivratri celebration at jejuri gad
Women's Day च्या पूर्वसंध्येला जीएसटी कार्यालयात खळबळ, 3 हजार रुपयांची लाच घेताना महिला अधिका-यास पकडले

कुणकेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवाला प्रारंभ

दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड येथील कुणकेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवाला आज पासून सुरवात झाली आहे. ह्या वर्षीचा शासकीय पूजेचा मान शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर (deepak kesarkar) यांना देण्यात आला होता. शासकीय पूजा झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन रांगा खुल्या केल्या जातात. कुणकेश्वर जत्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात करण्यात येणारी आकर्षक विद्युत रोषणाई नेहमीच लक्षवेधी ठरत असते. आंगणेवाडी प्रमाणे या जत्रोत्सवात देखील राजकीय नेते मंडळींची मांदियाळी पाहायला मिळते. तीन दिवस चालणाऱ्या या जत्रोत्सवाला महाराष्ट्रा बरोबरच गोवा कर्नाटक राज्यातुनही भाविक मोठ्या प्रमाणात कुणकेश्वरला भेट देतात.

गोकर्ण महादेव मंदिरात घोष दिवस साजरा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने महाशिवरात्रीला अखिल भारतीय घोष दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहादा शहरात असलेल्या गोकर्ण महादेव मंदिरात घोष दिवस साजरा करण्यात आला. गोकर्ण महादेव मंदिराचा गाभाऱ्यात स्वयंसेवकांच्या वतीने घोषवादन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी घोष पथकासह स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

mahashivratri celebration at jejuri gad
Sindhudurg : आंबोली ग्रामस्थांच्या लढ्याला आलं यश, हिरण्यकेशी परिसरातील अनधिकृत रिसॉर्ट जमीनदोस्त

कोल्हाळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

प्रभू श्रीरामचंद्रांनी स्थापित केलेल्या कोल्हाळेश्वर महादेव मंदिरात आज भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.. राहाता तालुक्यातील कोल्हार गावात असलेले महादेवाचे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून आज महाशिवरात्री निमित्त भाविक दर्शनाला गर्दी करत आहेत... अतीशय सुंदर बांधकाम केलेलं हे मंदिर भाविकांसाठी आकर्षण ठरत असून शिर्डी आणि शनी शिंगणापूरला येणारे भक्तही येथे सकाळपासून मोठी गर्दी करत आहेत.

महाशिवरात्री निमित्त नांदेश्वर मंदीर आकर्षक फुलांनी सजवले

महाशिवरात्री निमित्त नाशिकच्या नांदगाव शहरातील प्रसिध्द असलेल्या नांदेश्वर महादेव मंदिराला आकर्षक फुलांनी सजवले आहे. सकाळ पासून भाविकांनी बम भोले,ओम नम शिवाय असा गजर करत दर्शनाला गर्दी केली आहे. सकाळीच दुग्धाभिषेक होऊन महापुजा संपन्न झाली. फुलांनी सजवलेली भगवान शंकराची मूती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

mahashivratri celebration at jejuri gad
Saam Impact : शाळेच्या व्हरांड्यात बसून धडे गिरवणा-या विद्यार्थ्याला शिक्षणाची कवाडे खूली, 'साम टीव्ही' मुळेच झाले शक्य आरे ग्रामस्थांची भावना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com