Maharashtra Police Bharti 2024 : पोलिस भरतीत वयोमर्यादा वाढवून द्या : संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटना

Washim Latest Marathi News : राज्यात पाेलिस भरती हाेणार असल्याने ग्रामीणसह शहरातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
sambhaji brigade vidyarthi sanghatana demands to increase age for police bharti
sambhaji brigade vidyarthi sanghatana demands to increase age for police bharti saam tv
Published On

- मनोज जयस्वाल

Washim :

राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पोलिस भरतीमध्ये नुकतीच वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना किमान दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी वाशिम जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटनेने वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. त्याबाबतचे निवेदन प्रशासन आणि गृहमंत्र्यांना देखील पाठविण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटनेने केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात पाेलिस भरती हाेणार असल्याने ग्रामीणसह शहरातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. अनेक भागात युवक पाेलिस भरतीसाठी तयारी करु लागले आहेत. त्यासाठी व्यायाम आणि अभ्यास या दाेन्ही गाेष्टींचा कसून सराव केला जात आहे.  (Maharashtra News)

sambhaji brigade vidyarthi sanghatana demands to increase age for police bharti
Pimpri Chinchwad Crime News : सोनसाखळी चाेरट्यांना अटक, एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून पाच गुन्हे उघडकीस

दरम्यान मागील वर्षी राज्य सरकारने घोषणा करूनही पोलिस भरती झाली नव्हती. त्यामुळे राज्यातील 30 ते 40 हजार विद्यार्थी हे आता होणाऱ्या भरतीत वयोमर्यादातून बाद होणार आहेत. त्यांना ही वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटनेद्वारे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

sambhaji brigade vidyarthi sanghatana demands to increase age for police bharti
Women's Day च्या पूर्वसंध्येला जीएसटी कार्यालयात खळबळ, 3 हजार रुपयांची लाच घेताना महिला अधिका-यास पकडले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com