Pimpri Chinchwad Crime News : सोनसाखळी चाेरट्यांना अटक, एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून पाच गुन्हे उघडकीस

या तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी आठ तोळे तीनशे मिलिग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक मोटरसायकल असा एकूण चार लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
bhosari police arrests gold chain sanchter in pimpri chinchwad
bhosari police arrests gold chain sanchter in pimpri chinchwad saam tv
Published On

Pimpri Chinchwad :

पिंपरी चिंचवड शहरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरट्यांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (bhosari police) अटक केली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अक्षय राजू शेरावत आणि अजय राजू शेरावत अशी चाेरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चाेरीचा माल विकत घेणा-या अनिल अंकुश नानावत याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Maharashtra News)

अक्षय राजू शेरावत आणि अजय राजू शेरावत हे दोन्ही सोनसाखळी चोर खडीमशीन रस्त्यावर सोन्याचे दागिने विकायला येणार आहेत अशी गोपनीय माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली होती.

bhosari police arrests gold chain sanchter in pimpri chinchwad
Chandrapur : ईव्हीएम हटाव; लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, चंद्रपूरमध्ये माेर्चा

त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत दोन्ही सोनसाखळी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी आठ तोळे तीनशे मिलिग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक मोटरसायकल असा एकूण चार लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तिन्ही आराेपींकडून पाच सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

bhosari police arrests gold chain sanchter in pimpri chinchwad
APMC Market Vashi: एपीएमसीत लाल मिरचीची आवक वाढली; भाव काेसळला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com