APMC Market Vashi: एपीएमसीत लाल मिरचीची आवक वाढली; भाव काेसळला

Red Chilli Price: मार्च आणि एप्रिल अखेरपर्यंत मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता व्यक्त हाेऊ लागली आहे.
Red Chilli Price Slashed in Vashi's APMC Market | Saam Tv News
Red Chilli Price Slashed in Vashi's APMC Market | Saam Tv NewsSaam tv
Published On

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News:

लाल मिरचीचा हंगाम सुरू झाला आहे. एपीएमसी (Agriculture Produce Market Committee) बाजारात दररोज 50 टन पेक्षा जास्त लाल मिरचीची आवक होऊ लागली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मिरचीचे दर घटल्याने यंदा तिखट मिरचीचा ग्राहकांना गोड दिलासा मिळाला आहे. (Maharashtra News)

एपीएमसी बाजारात एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मिरचीचा हंगाम सुरू राहणार आहे. ग्राहकांकडून मार्च आणि एप्रिल अखेरपर्यंत मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता व्यक्त हाेऊ लागली आहे. यावर्षी पीक चांगले असल्याने लाल मिरचीचे दर नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Red Chilli Price Slashed in Vashi's APMC Market | Saam Tv News
Msedcl Contractual Workers Strike : कल्याणमध्ये वीज कंत्राटी कामगारांची एकजूट, बेमुदत काम बंद आंदोलनास प्रारंभ

एपीएमसी बाजारात असे आहेत मिरचीचे भाव

पांडी गेल्यावर्षी 310 रुपये प्रति किलाे यावर्षी 200 रुपये प्रति किलाे.

तेजा गेल्यावर्षी 300 रुपये प्रति किलाे यावर्षी 250 रुपये प्रति किलाे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बेडगी गेल्यावर्षी 650 रुपये प्रति किलाे यावर्षी 400 रुपये प्रति किलाे.

कश्मिरी गेल्यावर्षी 800 रुपये प्रति किलाे यावर्षी 500 रुपये प्रति किलाे.

Edited By : Siddharth Latkar

Red Chilli Price Slashed in Vashi's APMC Market | Saam Tv News
बुलढाणा : गरबा दांडियामध्ये खूनी हल्ला करणा-या युवकास जन्मठेप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com