- विनायक वंजारे
आंबोली (amboli) हिरण्यकेशी परिसरात अनधिकृतरित्या उभारलेले 27 बंगले वजा रिसाॅर्टवर प्रशासनाने पोलिस संरक्षणात तोडक कारवाई केली. गेले 20 दिवस सुरु असलेल्या ग्रामस्थांच्या लढ्याला अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त झाल्याने यश आले आहे. ग्रामस्थांनी या कारवाईचे स्वागत आणि समाधान व्यक्त केले. (Maharashtra News)
आंबोली येथील महाराष्ट्र सरकार व इतर हक्क वनखाते असलेल्या सरकारी जमिनीवर अतिक्रमणे करून रिसॉर्ट उभे करून बेकायदेशीर 27 बंगले बांधले होते. हे बंगले अनधिकृत असल्याने ते तात्काळ पाडण्यात यावेत यासाठी येथील ग्रामस्थानी गेले 20 दिवसांपासून साखळी उपोषण छेडले होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
खासदार विनायक राऊत (mp vinayak raut) यांनी घटनास्थळाची पाहणी करुन तातडीने अनधिकृत बांधकाम पाडावे अशी सूचना प्रशासनास देत ग्रामस्थांच्या आंदाेलनास पाठिंबा दिला हाेता.
अखेर ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले. हे अनधिकृत बंगले पोलिस संरक्षणात पाडण्यात आले. महसूल व वन विभागाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.