Maratha Andolan : परभणी जिल्ह्यात नेत्यांना गावबंदी, मराठा समाजाचा आज मूक माेर्चा

Parbhani Latest Marathi News : मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू ठेवला आहे.
maratha samaj muk morcha in parbhani today to support manoj jarange patil
maratha samaj muk morcha in parbhani today to support manoj jarange patil saam tv
Published On

Parbhani :

मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या विरोधात सरकारकडून लावण्यात आलेल्या एसआयटीविरुद्ध (SIT) आज (बुधवार) परभणी येथे मराठा समाजाकडून मूक मोर्चा (Maratha Samaj Morcha In Parbhani) काढला जाणार आहे. आरक्षणाचा प्रश्न अद्याप मिटला नसल्याने पुन्हा नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय मराठा समाजाने मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे. (Maharashtra News)

मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू ठेवला आहे. त्यास राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील यांच्यावर लावण्यात आलेली विशेष चौकशी समिती अर्थात एसआयटी (SIT) रद्द करावी अशी मागणी राज्यभरात जाेर धरु लागली आहे. परभणी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे यांची चाैकशी केली जाऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.

maratha samaj muk morcha in parbhani today to support manoj jarange patil
Dharashiv Crime News : धाराशिव पोलिसांची कामगिरी, घरफोडीतील एकासह सात जण अटकेत

दरम्यान आज परभणी येथे मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक माेर्चा काढण्यात येणार आहे. या माेर्चात असंख्य मराठा बांधव सहभागी हाेणार आहे. या माेर्चाच्या पार्श्वभूमीवर परभणी येथे पाेलिसांनी बंदाेबस्त ठेवला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

maratha samaj muk morcha in parbhani today to support manoj jarange patil
Parbhani : परभणीमध्ये कापसाच्या दरात 900 रुपयांची वाढ, साेयाबीन उत्पादकांना भाव वाढीची अपेक्षा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com