Dharashiv Crime News : धाराशिव पोलिसांची कामगिरी, घरफोडीतील एकासह सात जण अटकेत

आगामी काळात होणाऱ्या निवडणुका, सण उत्सव व जयंतीच्या अनुषंगाने धाराशिव पोलिसांनी रेकाॅर्डवरील गुन्हेगार आणि छाेटे माेठे गुन्हेगारांचा शाेध सुरु केला आहे.
dharashiv
dharashivsaam tv

- बालाजी सुरवसे

Dharashiv :

धाराशिव शहर व ग्रामीण पोलीस हद्दीतील घरफोडीतील सराईत आरोपीला अटक करण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना (dharashiv local crime branch police) यश आलं आहे. त्याच्याकडून एकूण ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दूसरीकडे तेरखेडा येथे धाराशिव पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत विविध गुन्ह्यातील ६ संशयितांना ताब्यात घेतलेे. (Maharashtra News)

९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

धाराशिव शहरासह ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासुन घरफोडीच्या अनेक घटना घडल्या. या गुन्ह्यातील सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शीतील रस्तापुर येथुन अटक केली.

यामध्ये आरोपी संतोष भोसले याला ताब्यात घेत त्याच्याकडुन १४.१० ग्रॅम सोन्याचे दागिने व १० हजार रोख रक्कम असा एकुन ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. संबंधित आराेपीस धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती एलसीबीने दिली.

dharashiv
Ghati Hospital : घाटी रुग्णालयात निघालात? थांबा! वाचा नवीन नियम

पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढी येथे धाराशिव पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवले. यामध्ये विविध गुन्ह्यातील ६ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगामी काळात होणाऱ्या निवडणुका, सण उत्सव व जयंतीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये मालमत्तेसंबधी आरोपींचा तसेच विविध गुन्ह्यातील पाहीजे,फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी हे कोंबिंग ऑपरेशन राबवत ६ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

dharashiv
RPI Lonavala : पार्किंगच्या नावाखाली लाेणावळा पालिकेचा जागा हडप करण्याचा डाव? आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम तातडीने सुरु करा : आरपीआय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com