RPI Lonavala : पार्किंगच्या नावाखाली लाेणावळा पालिकेचा जागा हडप करण्याचा डाव? आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम तातडीने सुरु करा : आरपीआय

Dr. Babasaheb Ambedkar : आंबेडकरी जनतेच्या सन्मानाला ठेच पोहचली असल्याचा आरोप आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी साम टीव्हीशी बाेलताना केला.
rpi andolan at lonavala nagarpalika for dr babasaheb ambedkar smarak
rpi andolan at lonavala nagarpalika for dr babasaheb ambedkar smarak saam tv

Lonavala Nagarparishad :

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (dr. babasaheb ambedkar) यांच्या स्मारकाचे काम थांबविल्याने लाेणावळ्यातील आरपीआयच्या (RPI) कार्यकर्त्यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना घेराव घातला. पार्किंगची जागा हडप करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा आराेप कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान तातडीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरु करा अशी मागणी सूर्यकांत वाघमारे ( अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र, आरपीआय) यांनी लाेणावळा पालिकेस केली. (Maharashtra News)

लोणावळ्यातील बाबासाहेब डहाणूकर हॉस्पिटल समोरील जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सुरू आहे. या कामामुळे रुग्णालयात वाहन तळाचा प्रश्न निर्माण होणार असून रुग्णवाहिका वळविण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने या कामाचा पुनर्विचार करावा अशी मागणी आमदार सुनील शेळके (mla sunil shelke) यांनी केली होती.

rpi andolan at lonavala nagarpalika for dr babasaheb ambedkar smarak
Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार गटास खिंडार? 137 पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला

हे काम गेले पंधरा दिवस झाले का थांबविले या विरोधात आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आरपीआयच्या वतीने नगरपरिषदेवर मोर्चा काढून मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची जागा पार्किंगच्या नावाखाली हडप करण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आंबेडकरी जनतेच्या सन्मानाला ठेच पोहचली असल्याचा आरोप आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी साम टीव्हीशी बाेलताना केला.

Edited By : Siddharth Latkar

rpi andolan at lonavala nagarpalika for dr babasaheb ambedkar smarak
Manoj Jarange Patil यांची SIT चौकशी रद्द करा; अर्धापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com