Prabhu Deva Birthday: प्रभू देवा कसा बनला भारताचा 'मायकल जॅक्सन', 100 पेक्षा जास्त चित्रपटातील गाणी केलेत कोरिओग्राफ

Prabhu Deva Bday Special: नॅशनल अवॉर्ड विनर प्रभू देवाने ५० शी ओलांडली तरी देखील तो तरुण डान्सर्सला टक्कर देतो. 3 एप्रिल 1973 रोजी म्हैसूर येथे जन्मलेल्या प्रभू देवाला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये १०० पेक्षा अधिक चित्रपटातील गाणी कोरिओग्राफ केले आहेत.
Prabhu Deva
Prabhu DevaSaam Tv
Published On

Indias Michael Jackson Prabhu Deva :

भारतातील टॉप डान्सर आणि कोरिओग्राफर्सचा विषय येतो तेव्हा साऊथ सुपरस्टार प्रभू देवाचे (Prabhu Deva) नाव पहिले घेतले जाते. प्रभू देवा उत्कृष्ट अभिनेता, डान्सर, कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक आहे. प्रभू देवा आज आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. नॅशनल अवॉर्ड विनर प्रभू देवाने ५० शी ओलांडली तरी देखील तो तरुण डान्सर्सला टक्कर देतो.

3 एप्रिल 1973 रोजी म्हैसूर येथे जन्मलेल्या प्रभू देवाला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये १०० पेक्षा अधिक चित्रपटातील गाणी कोरिओग्राफ केले आहेत. त्याची डान्स स्टाइल आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्याने कोरिओग्राफ केलेले गाणं सुपरहिट झाल्याशिवाय राहत नाही. आज आपण प्रभू देवाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या करिअर आणि पर्सनल लाइफविषयी जाणून घेणार आहोत...

प्रभू देवाचे पूर्ण नाव प्रभुदेव सुंदरम असे आहे. प्रभू देवाला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. प्रभू देवा उत्तम क्लासिकल डान्सर आहे. तो भरतनाट्यम देखील शिकला आहे. प्रभू देवाचे वडील देखील एक उत्तम डान्सर होते. त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये डान्स मास्टर म्हणून काम केले होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब नृत्याशी संबंधित आहे. त्यांचे दोन्ही भाऊ राजू सुंदरम आणि नागेंद्र प्रसाद हे देखील कोरिओग्राफर आहेत.

प्रभू देवा हा मायकल जॅक्सनसारख्या डान्ससाठी प्रसिद्ध असला तरी प्रत्यक्षात तो एक क्लासिकल डान्सर आहे. प्रभूदेवाने एका मुलाखतीत त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले होते की, 'मी खरं तर एक क्लासिकल डान्सर आहे. मी माझ्या गुरूंकडून भरतनाट्यम शिकलो. त्याच काळात मायकल जॅक्सनचा थ्रिलर अल्बम आला तो पाहून मी थक्क झालो. मायकल जॅक्सनचा माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव आहे.' नृत्य दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट 'वेत्री विज्ह' होता. १९९४ मध्ये त्यांनी ‘इंदू’ हा चित्रपट केला. प्रभू देवाने १०० पेक्षा अधिक चित्रपटांना कोरिओग्राफ केले आहे. प्रभू देवाला २०१९ मध्ये त्याचे काम आणि डान्स फिल्डमधील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाला. नृत्यदिग्दर्शनासाठी त्याला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

१९९४ मध्ये प्रभू देवाने 'निधू' चित्रपटातून अभिनेता म्हणून काम करण्यास सुरूवात केली. तोपर्यंत तो आपल्या डान्सने चांगलाच लोकप्रिय झाला होता. यानंतर प्रभूदेवाने एकामागून एक अनेक चित्रपट केले. प्रभूदेवाची क्रेझ एवढी होती की, एकेकाळी त्याने आपली फी ५० लाखांपर्यंत वाढवली होती. हळूहळू प्रभू देवाने दिग्दर्शनात हात आजमावायला सुरुवात केली आणि त्यातही त्याला यशही मिळाले. प्रभू देवाने २००९ मध्ये 'वॉन्टेड' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. सलमान व्यतिरिक्त प्रभुदेवाने अक्षयसोबत 'राउडी राठौर' आणि शाहिदसोबत 'राजकुमार' असे अनेक हिट चित्रपट केले.

Prabhu Deva
OTT Release April 2024: मनोरंजनाचा धमाका! 'फर्रे' ते 'सायलेंस 2' पर्यंत, OTT वर रिलीज होणार 7 चित्रपट-वेब सीरिज

प्रभूदेवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. साऊथ अभिनेत्री नयनतारासोबत त्याचे नाव जोडले गेले होते. त्याच्या नात्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. चित्रपटाच्या सेटवर दोघेही प्रेमात पडले. जेव्हा नयनताराने प्रभू देवाला डेट करायला सुरुवात केली तेव्हा प्रभू देवा विवाहित होता. दोघेही इतके प्रेमात पडले की ते एकत्र राहू लागले. प्रभू देवाने २०११ मध्ये आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि १६ वर्षांचे नाते तोडले.

Prabhu Deva
Pushpa 2 The Rule Poster: अल्लू अर्जुनने शेअर केला 'पुष्पा 2'चा मजेशीर पोस्टर, टीझरच्या रिलीज डेटची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com