OTT Release April 2024: मनोरंजनाचा धमाका! 'फर्रे' ते 'सायलेंस 2' पर्यंत, OTT वर रिलीज होणार 7 चित्रपट-वेब सीरिज

Bollywood Movie Release On OTT: या महिन्यात 'अमर सिंह चमकीला', 'ये मेरी फॅमिली', 'आर्टिकल 370', 'फ्रँकलिन' आणि 'फॅमिली आज कल' सह अनेक वेबसीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
OTT Release April 2024
OTT Release April 2024Saam Tv

Webseries Release On OTT Platform:

एप्रिल महिन्याला सुरूवात झाली आहे. एप्रिल महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याचसोबत या महिन्यामध्ये अनेक चांगल्या धाटणीच्या आणि जबरदस्त कंटेट असलेल्या वेबसीरिज रिलीज होणार आहेत. प्रेक्षक या वेबसीरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. एकीकडे ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर आयपीएलची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे महिनाभर चित्रपट आणि वेब सीरिजची धूम सुरू राहणआर आहे. म्हणजे या महिन्यात मनोरंजनाचा धमाका असणार आहे.

या महिन्यात 'अमर सिंह चमकीला', 'ये मेरी फॅमिली', 'आर्टिकल 370', 'फ्रँकलिन' आणि 'फॅमिली आज कल' सह अनेक वेबसीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आज आपण एप्रिल महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणते चित्रपटा आणि वेबसीरिज कधी आणि कुठे रिलीज होणार हे पाहणार आहोत...

ये मेरी फॅमिली -

जुही परमार आणि राजेश कुमार 'ये मेरी फॅमिली'च्या तिसऱ्या सीझनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये जुही परमार ही नीरजाची भूमिका साकारणार आहे. ही वेबसीरिज ४ एप्रिल रोजी Amazon Mini TVवर रिलीज होणार आहे.

फर्रे -

सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्रीचा 'फर्रे' हा चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून अलीजेहने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मागच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून आता तो ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट येत्या ५ एप्रिल रोजी Zee5 वर रिलीज होणार आहे.

साइलेंस 2 -

तुम्हाला मनोज वाजपेयीचे चित्रपट किंवा वेब सिरीज पाहण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी हा चित्रपट खास असणार आहे. २०२१ मध्ये 'सायलेन्स: कॅन यू हिअर इट?' चित्रपट आला होता. आता त्याचा सीक्वल ३ वर्षांनी येत आहे. हा चित्रपट १० एप्रिल रोजी Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.

अदृश्यम -

टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने टीव्ही इंडस्ट्रीत चांगले नाव कमावले. आता दिव्यांका 'अदृश्यम' वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या वेबसीरिजमध्ये एजाज खान मुख्य भूमिकेत आहे. ही वेबसीरिज ११ एप्रिल रोजी सोनी लिववर प्रदर्शित होणार आहे.

अमिर सिंह चमकीला -

अमर सिंह चमकीला हा चित्रपट १२ एप्रिल रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पंजाबी गायक अमर सिंग चमकीला यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात परिणीती अमरजोतची भूमिका साकारणार आहे.

Parasyte: The Grey -

जर तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही हटके पाहण्याची इच्छा अशेल तर तुमच्यासाठी Parasyte: The Grey हा उत्तम पर्याय आहे. ही वेबसीरिज ५ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

फॅमिली आज कल -

जर तुम्हाला फॅमिलीसोबत बसून चित्रपट पाहायचा असेल तर तुमच्यासाठी फॅमिली आज कल हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये अपूर्व अरोड़ा, सोनाली सचदेव, दिवंगत नितेश पांडे, आकर्षण सिंह, प्रखर सिंह और मसूद अख्तर हे मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ३ एप्रिल रोजी सोनी लिववर प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com