Meditation For Mental Health : मानसिक ताण कमी करण्यासह मेडिटेशन केल्याने आरोग्याला मिळतात 'हे' गुणकारी फायदे

Health Benefits : मनशांतीसह मेडिटेशन केल्याने आपल्या आरोग्यावर देखील याचे पॉझिटीव्ह परिणाम होतात. निसर्गाच्या सानिध्यात शांत बसून दीर्घ श्वास घेतल्याने आपल्या शरीरात प्रकृतीशी जोडलेली शुद्ध हवा श्वासावाटे शरीरात प्रवेश करते.
Meditation For Mental Health
Mental HealthSaam Tv
Published On

मेडिटेशनमध्ये प्रत्येक व्यक्ती एका ठिकाणी ध्यान मग्न अवस्थेत बसतो आणि स्वत:बद्दल विचार करत असतो. त्य त्याने मन शांत होते आणि आपण काय केले पाहिजे, तसेच काय नाही केले पाहिजे याबाबत व्यक्तीला समजते. मनशांतीसह मेडिटेशन केल्याने आपल्या आरोग्यावर देखील याचे पॉझिटीव्ह परिणाम होतात. निसर्गाच्या सानिध्यात शांत बसून दीर्घ श्वास घेतल्याने आपल्या शरीरात प्रकृतीशी जोडलेली शुद्ध हवा श्वासावाटे शरीरात प्रवेश करते. त्याने बुद्धी आणखी तल्लख होते.

Meditation For Mental Health
PM Modi: प्रचार संपल्यानंतर PM मोदी करणार ध्यानधारणा, यंदा तामिळनाडूत जाणार; कसं असणार शेड्युल?

सध्या प्रत्येक व्यक्ती धकाधकीचे जीवन जगत आहे. कामाचा ताण, अन्य व्यक्तींशी आणि जवळच्या व्यक्तींशी असेले नातेसंबंध या सर्वांमुळे प्रत्येकाला मेडिटेशन गरज भासते. मेडिटेशन केल्याने तुमच्या आरोग्याला आणखी काय काय फायदे होतात त्याची महिती आज जाणून घेणार आहोत.

मेडिटेशन केल्याने व्यक्तीचं मन स्थिर होतं आणि आपल्याला वर्तमानात जगण्यासाठी मार्ग मिळतो.

प्रत्येक दिवशी व्यक्ती उद्याचा विचार करत जगत असतात, मात्र मेडिटेशन केल्याने तुम्ही प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण आनंदात जगण्यास सुरुवात कराल.

मेडिटेशन केल्याने ती व्यक्ती आधीपेक्षा जास्त जागरुक आणि सजग होते. त्यामुळे समोरील प्रत्येक स्थिती तिला सोप्पी वाटते.

मेडिटेशन आपल्याला नवनवीन गोष्टींचा विचार करण्यासाठी मदत करते. त्याने कल्पनाशक्ती वाढते.

रोजच्या आयुष्यात आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे व्यक्तीच्या मनात विविध विचार येतात. या विचारांना दूर करण्यासाठी व्यक्ती मेडिटेशन करतात. त्यामुळे तुम्ही कायम पॉझिटिव्ह विचार करू लागता.

मेडिटेशन केल्याने आपल्या मनावर असलेला स्ट्रेस, एंग्झायटी देखील कमी होते.

एखाद्या चुकीच्या गोष्टीने झटकन राग येत नाही. तसेच आरोग्याशी संबंधित अनेक आजार दूर होतात.

मेडिटेशन करणाऱ्या व्यक्तींना शांत आणि छान झोप सुद्धा लागते.

आपल्या आसपास असलेल्या व्यक्ती, निसर्ग, प्रकृती या सर्वांबाबत आपल्या मनात कृतज्ञता निर्माण होते.

कठीण परिस्थितीमध्ये देखील तुमचं मन शांत राहतं आणि अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतं.

टीप : ही सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

Meditation For Mental Health
Meditation Benefits | मेडिटेशन केल्याने काय होतं? काय फायदे? | Marathi News

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com