सेजल पुरवार
प्रत्येक स्त्रीला नटायला, साज-शृंगार करायला आवडते आणि हिंदू रिती रिवाजात स्त्रीच्या शृंगारातील अविभाज्य घटक म्हणजे नथ. मात्र तुम्हाला माहिती आहे का नथ का घातली जाते? नथ ही केवळ सुंदरतेसाठीच घालतात असे नाही तर नथ ही अगदी एखाद्या मैत्रीणीप्रमाणे स्त्रीला अनेक शारिरिक समस्यांपासून देखील लांब ठेवते म्हणूनच स्त्रीचे लग्न होताच स्त्रीचे नाक टोचले जाते.
पूर्वी एक प्रथा होती, पुरूषाच्या कानात बुगडी आणि स्त्रीच्या नाकात नथ राहायचीच आणि त्यात मोती असायचा. मोत्याची विशिष्टता आहे की तो आपल्याला शांत करतो. त्यामुळे पुरूषाला किंवा महिलेला राग आला तर त्यांचा राग शांत करण्यासाठी हे दागिने घातले जायचे असे सांगतात. मात्र हा दागिना आपल्याकडे आला कुठून हे माहिती आहे का? तर नाकाच्या रिंगचा अर्थातच नथेचा इतिहास 4 हजार वर्षांहून जुना आहे. इराण आणि इराक सारख्या मध्य पूर्व देशांमध्ये नथेला 'शांफ' म्हटले जायचे. नथ हा दागिना इस्रायलहून इराणमार्गे भारतात आलाय.
भारतात कान टोचण्याची प्रथा फार जुनी आहे. पण नाक टोचण्याचा उल्लेख नाही. इस्रायलमध्ये ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी नाक टोचण्याची पद्धत होती. इस्रायलनंतर इराणमार्गे नथ भारतातील मुघल राजवाड्यांपर्यंत पोहोचली. याचाच अर्थ मुघलांनी भारतात नाकाची रिंग म्हणजेच नथ आणली आणि तेव्हापासून नथ हा दागिना स्त्रीच्या शोभेचा भाग बनला.
भारतीय संस्कृतीत नथीचे महत्त्व
भारतीय संस्कृतीत, प्रदेश, संस्कृती आणि श्रद्धेनुसार नथीला वेगवेगळे महत्त्व आहे. नथ हा हिंदू संस्कृतीतील वधूच्या दागिन्यांपैकी एक महत्त्वाचा दागिना आहे. नथ हे विवाह आणि स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते. जे थेट देवी पार्वतीशी आपला संबंध दाखवते. नाकात नथ घालणे पौराणिक मान्यतेनुसार गरजेचे आहे असे सांगितले जाते. मात्र नथ घालणे ही आजच्या काळात एक फॅशन झाली आहे. त्यामुळे सण-समारंभ किंवा लग्न अशा विशेष कार्यक्रमांमध्ये महिला नथ घालतात.
नथ आणि स्त्रीचे आरोग्य
नाकाची नथ स्त्रीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे, भारतीय आयुर्वेदानुसार, नाकाच्या एका भागात छिद्र पडल्याने मासिक पाळीचा त्रास बर्याच प्रमाणात कमी होतो. म्हणूनच महिलांनी नाकात नथ घातल्याने मासिक पाळीच्या वेदनेपासून आराम मिळतो असे सांगितले जाते.
याशिवाय भारतीय आयुर्वेदानुसार स्त्रियांच्या नाकपुड्या प्रजननाच्या अवयवांशी जोडलेल्या असतात अशा स्थितीत नाकाची नथ घातल्याने प्रसूतीच्या वेळी होणारा त्रास कमी होतो. प्रसूतीत अडचणी कमी येतात. कारण नथ ही डाव्या नाकपुडीत घातली जाते. ज्याचा थेट संबंध स्त्रीच्या गर्भाशयाशी असतो. नाक टोचल्याने महिलांना सायनस किंवा मायग्रेनचा त्रास कमी जाणवतो. शिवाय नाकात धातू घातल्याने शरिरातील रक्तदाब किंवा वात नियंत्रणात राहतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.