Nose Bleeding Remedies : तीव्र उन्हात नाकातून रक्तस्त्राव होतोय? या घरगुती उपायांनी थांबवा

Nose Bleeding : उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याची समस्या अधिक असते.
Nose Bleeding Remedies
Nose Bleeding RemediesSaam Tv
Published On

Remedies Of Nose Bleeding : उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याची समस्या अधिक असते. जे 3 ते 10 वर्षांच्या मुलांमध्ये सामान्य आहे. पण प्रौढांनाही हा त्रास होऊ शकतो. याला अनेक समस्या कारणीभूत असू शकतात, पण सर्वात मोठे कारण म्हणजे शरीराचे तापमान (Temperature) वाढल्याने मेंदूपर्यंत पोहोचणारी उष्णता. याशिवाय गरम पदार्थांचे अतिसेवन केल्यानेही नाकातून रक्तस्राव होतो.

नाकातून रक्त येणे म्हणजे काय?

नाकातून रक्त येणे म्हणजे वैद्यकीय भाषेत एपिस्टॅक्सिस. नाकाच्या जवळ एक जागा आहे ज्यामध्ये रक्तपुरवठा अधिक होतो. जेव्हा या भागात दुखापत होते किंवा रक्तदाब वाढतो तेव्हा येथील रक्तवाहिन्या उघडतात ज्यामुळे रक्त (Blood) वाहू लागते. तसे, दीर्घकाळापर्यंत थंडीमुळे (Cold) नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवू शकते.

Nose Bleeding Remedies
Nose Exercise : 'या' 3 व्यायामांनी हसताना दिसेल तुमचे नाक आणखीन सुंदर, चला तर पाहूयात

कारण काय आहे?

नाकातून रक्तस्त्राव होण्याची अनेक कारणे असू शकतात. सर्वात सामान्य कारण म्हणजे हवामानातील बदल. याशिवाय नाकातील ऍलर्जी, कोणत्याही अंतर्गत शिरा किंवा रक्तवाहिन्यांना इजा होणे, जास्त उष्णता, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, सायनस, रक्तदाब, जास्त शिंका येणे, सर्दी किंवा जास्त नाक घासणे यामुळेही हा त्रास होऊ शकतो.

Nose Bleeding Remedies
Nose Picking Habit : तुम्हालाही नाकात सतत बोट घालण्याची सवय आहे ? 'या' सवयी वेळीच सोडा, अन्यथा...

नाकातून रक्तस्त्राव कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय करा -

  • त्यातून त्वरित आराम मिळवण्यासाठी कोल्ड कॉम्प्रेस हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. असे करा-

  • टॉवेलमध्ये बर्फाचे तुकडे गुंडाळा आणि नाकावर ठेवा.

  • मध्येच टॉवेलने नाक हलके दाबत राहा.

  • हे 4-5 मिनिटे करावे लागेल.

Nose Bleeding Remedies
Puneri Patya | पुणेरी पाट्या कोणी सुरू केल्या? पाहूयात या मागची कहाणी

याचा फायदा कसा होतो?

बर्फाच्या थंडीमुळे रक्तस्त्राव कमी होतो. त्यामुळे रक्तस्त्राव थांबतो. फक्त लक्षात ठेवा की थेट बर्फ नाकावर ठेवू नये.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com