Nose Picking Habit : तुम्हालाही नाकात सतत बोट घालण्याची सवय आहे ? 'या' सवयी वेळीच सोडा, अन्यथा...

पाहायला गेलं तर लहान मुलांपासून ते मोठया माणसांपर्यंत सगळेच आपल्या नाकात बोटे फिरवतात.
Nose Picking Habit
Nose Picking HabitSaam Tv
Published On

Nose Picking Habit : नाकामध्ये बोटं घालण्याची सवय अत्यंत हानिकारक असते. तस पाहायला गेलं तर लहान मुलांपासून ते मोठया माणसांपर्यंत सगळेच आपल्या नाकात बोटे फिरवतात.

मेडिकलटर्म नुसार नाकामध्ये बोटं फिरवण्याच्या प्रक्रियेला राइनोटीलेक्सोमेनीया म्हटले जाते. सतत नाकात बोटं फिरवली तर काय होऊ शकत याचा तुम्हाला अंदाज आहे का?. वेळीस सावधान व्हा नाहीतर तुमची ही घाणेरडी सवय तुमच्या आरोग्यावर विपरीत परीणाम करू शकते.

Nose Picking Habit
Nose Exercise : 'या' 3 व्यायामांनी हसताना दिसेल तुमचे नाक आणखीन सुंदर, चला तर पाहूयात

सतत नाकात बोटं फिरवल्यामुळे तुम्हाला एक घाणेरडी सवय लागू शकते. नाकात बोटे सगळेच फिरवतात पण सांगत कुणीच नाही. कोणी न लाजता नाकात बोट फिरवतात तर कोणी लपुनछपून नाकात बोटं फिरवून घाण साफ करतात.

बऱ्याचदा असं होतं की, आपल्याला कोणी नाकात बोटं फिरवताना पाहिले तर आपण लाजून लगेच एकडे तिकडे पाहू लागतो. हे सगळं खरचं हास्यास्पद आहे. नाकात बोटे घालून तुम्ही तुमचं फार मोठं नुकसान करत आहात.

Nose Picking Habit
Nose Picking Habitcanva

ऑस्ट्रेलियाच्या ग्रीफिथ युनिव्हर्सिटीच्या रिसर्चने उंदरांवरती अभ्यास केला आहे. या रिसर्च मध्ये उंदराच्या नाकातील बॅक्टेरिया त्याच्या नाकातील नळी मधून त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचला. या बॅक्टेरियामुळे अल्जायमर होऊ शकतो असा दावा केला गेला आहे. ही अभ्यासिका सायन्स मॅक्झिम सायंटिफिक रिपोर्टस् मध्ये पब्लिश झाली. यामध्ये सांगितलं गेलं की, कलामीडिया या नावाचा बॅक्टेरिया माणसाला संक्रमित करू शकतो. त्याचबरोबर हा बॅक्टेरिया निमोनिया या आजाराला आमंत्रण ठरू शकतो.

नाकामध्ये बोट फिरवणे हे वेस्टीबुलाईटीसचं कारण बनू शकते. त्यामुळे नाकमध्ये तीव्र खाज येते. जर तुम्ही नाकामध्ये बोट फिरवत असाल तर या प्रक्रियेत तुमच्या नाकातील केस खेचली जाऊ शकतात आणि त्यामुळे त्या जागी छोटे छोटे दाने येऊ शकतात.

बऱ्याचदा नाकामध्ये जमा असलेली घाण काढण्यासाठी आपण नाकामध्ये बोट फिरवतो ज्यामुळे रक्तवाहिनिला चुकून एखाद नखं लागून नाकातून रक्त येऊ शकते. रिसर्चच्या म्हणण्याप्रमाणे नाकात बोटे फिरवने ही अत्यंत वाईट सवय आहे.

नाकात बोटं फिरवल्याने तुमच्या नाकफुड्यानची पाकळी खराब होऊ शकते आणि नाकातला बॅक्टेरिया मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. ज्यामुळे तुम्हाला कमी ऐकू येणे आणि समोरच्याच बोलणं न समजणे अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशा प्रकारच्या आजाराला अल्जायमर सुद्धा म्हटले जाते. या सवयीमुळे तुम्हाला निमोनिया होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com