Hot Vegetable Soup SAAM TV
लाईफस्टाईल

Hot Vegetable Soup : सर्दी - खोकला मिनिटांत होईल छुमंतर; पावसाळ्यात प्या हॉट वेज सूप

Shreya Maskar

पावसाळ्यात बदलत्या हवामानामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. अशात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. पावसात भिजल्यामुळे अनेकांना पटकन सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. अशात घशाला आराम मिळण्यासाठी गरमागरम सूप प्यावे.

सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय

पावसाळ्यात (Monsoon) सर्दी, खोकल्याच्या सामान्य समस्या उद्भवते. कारण पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. व्हायरल इन्फेक्शनमुळे आरोग्याला त्रास होतो. नाक बंद होते किंवा घसा खवखवतो. खोकला वाढतो. अशात घशाला आराम मिळण्यासाठी गरमपदार्थ खाणे फायदेशीर ठरते. कारण त्यामुळे घशाला शेक मिळतो. पावसाळ्यात पौष्टिक गुणधर्मांनी युक्त अन्नपदार्थ खाणे गरजेचे असते. डॉक्टरही पावसाळ्यात सूप पिण्याचा सल्ला देतात. तुम्ही यासाठी भाज्यांचा वापर करू शकता. कारण पावसाळ्यात हिरव्या भाज्या (Green Vegetables ) खाल्ल्याने शरीराला ताकत मिळते.

हॉट वेज सूप

साहित्य

  • कांदा

  • हिरवी मिरची

  • लसूण ‌

  • ब्रोकोली

  • गाजर

  • ओवा

  • बडीशेप

  • ऑलिव्ह ऑइल

  • पाणी

कृती

हॉट वेज सूप (Veg Soup) बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण, कांदा घालून ४-५ मिनिटे परतून घ्या. आता तुमच्या आवडीनुसार यात भाज्या कापून टाका. त्यानंतर यात थोडेसे पाणी घालून उकळी येईपर्यंत छान शिजवा. आता या मिश्रणात मीठ, काळी मिरी घालून छान मिक्स करून घ्या. सूप सर्व्ह करताना गाळून घ्या. अशाप्रकारे गरमागरम हॉट वेज सूप तयार झाले.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT