Monsoon Travel : निसर्गप्रेमींसाठी नंदनवन! पावसाळ्यात करा 'गडचिरोली' ची सफर, टेन्शन विसराल अन् मूड होईल फ्रेश

Gadchiroli : पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'गडचिरोली'ची सफर करा. लहान मुलांना मजा करता येईल अशा निसर्गरम्य ठिकाणांना भेट द्या.
Gadchiroli
Monsoon TravelSAAM TV
Published On

महाराष्ट्रात विदर्भातील गडचिरोली या ठिकाणाचे पावसाळ्यात आणखी सौंदर्य वाढवले आहे. हिरवागार परिसर आणि ओलेचिंब रस्ते येथे तुम्हाला पाहायला मिळतील. या वीकेंडला तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत येथे फिरण्याचा प्लान करू शकता. लहान मुलांसाठी ही पर्यटनाची खास ठिकाण आहेत. तसेच कामाच्या व्यापातून निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाल फ्रेश वाटेल.

आलापल्ली

गडचिरोली मधील आलापल्ली हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांचे आकर्षण आहे. येथील वनवैभवात पाहून तुमचे मन शांत होईल. आलापल्ली येथे वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि औषधी वनस्पती पाहायला मिळतात. हे ठिकाण उद्यानासारखे दिसते. निसर्गप्रेमींसाठी हे एक प्रकारचे नंदनवन आहे. येथे मोठ्या प्रमाणात हिरवळ असल्यामुळे नेहमी थंड वातावरण पाहायला मिळते. विविध जातीचे पक्षी येथे दिसतात. लहान मुलांसाठी फिरण्याचे उत्तम ठिकाण आहे.

मार्कंडा मंदिर

गडचिरोलीमधील मार्कंडा मंदिर पर्यटकांचे आकर्षण आहे. हे पवित्र आणि प्राचीन मंदिर आहे. मार्कंडा मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. मंदिराचा परिसर मनाला शांती देऊन जातो. मार्कंडा मंदिर वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे मंदिर उत्तम वास्तुकलेचा नमुना आहे. येथून सूर्यास्ताचे सुरेख दृश्य अनुभ‌ता येते.

Gadchiroli
Konkan Travel : पावसाळ्यात भटकंतीचा प्लान करताय? राजापूरमधील Hidden Spots ना भेट द्या अन् निसर्गाच अद्भूत रूप अनुभवा

चपराळा अभयारण्य

‌महाराष्ट्रातील लोकप्रिय ठिकानांमध्ये चपराळा वन्यजीव अभयारण्य ओळखले जाते. चपराळा वन्यजीव अभयारण्य वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. त्यामुळे येथे भरपूर पाणी पुरवठा होतो. ज्यामुळे अभयारण्य वर्षभर हिरवेगार दिसते. येथे ‌विविध जातीचे प्राणी आढळतात. येथे तुम्ही जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता. लहान मुलांसोबत येथे वीकेंड पिकनिक प्लान करा. फिरण्यासोबत त्यांचा अभ्यास देखील होईल.

वैरागड किल्ला

वैरागड किल्ला हा 9 व्या शतकात बांधण्यात आला आहे. वैरागड किल्ला खोब्रागडी आणि सतनाला नद्यांच्या संगमावर वसलेला आहे. हा किल्ला डोंगराच्या माथ्यावर आहे. गडाच्या उंचीवरून गडचिरोलीचे अद्भुत दृश्य पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करण्यासाठी हे खास ठिकाण आहे.

Gadchiroli
Monsoon Travel : ओले चिंब रस्ते अन् बहरलेला निसर्ग! पावसाळ्यात मुंबईजवळील 'हे' खास धबधबे फिरायला विसरू नका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com