Konkan Travel : पावसाळ्यात भटकंतीचा प्लान करताय? राजापूरमधील Hidden Spots ना भेट द्या अन् निसर्गाच अद्भूत रूप अनुभवा

Rajapur Hidden Spots : पावसाळ्यात कोकणात फिरण्याचा प्लान करत असाल तर, राजापूर हे बेस्ट लोकेशन आहे. येथे तुम्ही कुटुंबासोबत मनमुराद फिरण्याचा आनंद घेऊ शकता.
Rajapur Hidden Spots
Konkan TravelSAAM TV
Published On

कोकण हे पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. पावसाळ्यात कोकणाचे सौंदर्य मनाला मोहून टाकते. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिध्द पर्यटनस्थळे आहेत जे महाराष्ट्राचे सौंदर्य वाढवतात. मात्र आपल्याला या बद्दल जास्त काही माहित नसते. आज आपण अशाच Hidden Spots विषयी जाणून घेणार आहोत.

रत्नागिरीतील राजापूर पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पिकनिक प्लान करू शकता. कला-संस्कृती-निसर्गाने कोकण किनारपट्टी सजलेली आहे.

राजापूरची गंगा

राजापूरला आल्यावर राजापूरची गंगेला आवर्जून भेट द्या. राजापूर हे व्यापारी पेठ आहे. या तीर्थस्थानाला महाराष्ट्रात मोठी मान्यता आहे. राजापूर रत्नागिरी जिल्ह्यात येते. यादव काळापासून राजापूरला मोठे महत्त्व आहे. गंगेचे दर्शन घेऊन स्नान करण्यासाठी येथे भाविक गर्दी पाहायला मिळते. तसेच येथे जमिनीत पाण्याची कुंडे तुम्हाला पाहायला मिळतील.

जुवे बेट

राजापूर तालुक्यातील जुवे गावात जुवे बेट आहे. येथे तुम्हाला कौलारू घरे पाहायला मिळतील. येथे आंबा, काजूची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. संध्याकाळचा सूर्यास्त पाहणे म्हणजे येथे निसर्गाचे अद्भूत रूप अनुभवणे होय. अर्जुना नदीच्या मुखाशी जुवे बेट वसलेले आहे. हा शांत परिसर मनाला सुखावून जातो. हे ठिकाण फोटोशूटसाठी उत्तम ठिकाण आहे.

Rajapur Hidden Spots
Monsoon Travel : ओले चिंब रस्ते अन् बहरलेला निसर्ग! पावसाळ्यात मुंबईजवळील 'हे' खास धबधबे फिरायला विसरू नका

उन्हाळे

राजापूर येथील उन्हाळे या गावी तुम्हाला गरम पाण्याचे झरे पाहायला मिळतील. पावसळ्यात या गरम पाण्याच्या झऱ्याचा अनुभव मनासोबत शरीराला देखील आनंद देऊन जातो. या गावातील महालक्ष्मी मातेच्या चरणापासून झऱ्याची निर्मिती झाली असे येथील गावकऱ्यांचे मत आहे. येथे तुम्हाल बाराही महिने गरम पाण्याचे झरे पाहायला मिळतात. हिरवागार निसर्ग आणि रम्य शांत वातावरण उन्हाळेचे सौंदर्य वाढवतो.

संगमेश्वर मंदिर

राजापूर मधील संगमेश्वरला अनेक प्राचीन मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे इच्छापूर्ती आहेत. संगमेश्वर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण होय. येथून राजापूरचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते.

Rajapur Hidden Spots
Tourism in Vangani : वांगणीतील सुंदर अन् मनमोहक धबधबा; निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी नक्की भेट द्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com