Home Remedy for Cough and Cold Saam TV
लाईफस्टाईल

Home Remedy for Cough and Cold : सर्दी खोकल्याने त्रस्त आहात; मग करा हा गावरान उपाय

Health Update : आता तुम्हाला देखील सर्दी खोकला झाला असेल तर आम्ही आज तुमच्यासाठी काही घरगुती औषधे आणली आहेत. या औषधांचा वापर करून तुम्हाला झटपट आराम मिळू शकतो.

Ruchika Jadhav

सध्या पावसाळा सुरू झालाय. वातावरण बदलल्याने अनेक व्यक्तींना सर्दी, खोकला असे आजार होऊ लागलेत. सर्दी खोकला असे आजार आहेत ज्यामध्ये डोकं, घसा, नाक दुखू लागतं. मात्र अनेक व्यक्ती या आजारांना शुल्लक समजतात आणि स्वतःची नीट काळजी घेत नाहीत.

आता तुम्हाला देखील सर्दी खोकला झाला असेल तर आम्ही आज तुमच्यासाठी काही घरगुती औषधे आणली आहेत. या औषधांचा वापर करून तुम्हाला झटपट आराम मिळू शकतो.

आले असलेला चहा

प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यावर चहा पितो. आता तुम्हालाही सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याची सवय असेल तर आले घातलेला चहा तुम्ही पिऊ शकता. आल्यामध्ये असलेले घटक तुम्हाला घसा दुखत असल्यास आराम मिळवून देतील.

तुळशीचा काढा

तुळस विविध आजारांवर गुणकारी आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुळस असलेला चहा प्यायला पाहिजे. त्याने आरोग्याशी निगडित अनेक समस्या दूर होतात तुळस पाण्यात उकळवून घ्या. त्यांमध्ये थोडी वेलची पूड मिक्स करा आणि हे पाणी गाळून पिऊन घ्या. याने देखील सर्दी बरी होते.

सुंठ

सुंठ देखील आपल्याला सर्दी खोकला बरा करण्यासाठी मदत करते. जर खोकला थांबत नसेल आणि घशात सतत खवखव होत असे तर सुंठ बारीक करून घ्या. याचे सेवन तुम्ही मधासोबत करू शकता.

कोमट पाणी

सर्दीने नाक आणि घसा जाम झाला असेल तर थंड पाणी पिणे बंद करा. आजपासून कोमट पिण्यास सुरुवात करा. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी देखील स्वच्छ येत नाही. त्यामुळे शक्यतो पाणी उकळून घ्या. त्यानंतर कोमट करून त्याचे सेवन करा.

वाफ घ्या

वाफ घेणे आपल्या आरोग्यासह चेहऱ्यासाठी फार छान आहे. त्यामुळे तुम्ही देखील दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी वाफ घ्या. वाफ घेताना त्या पाण्यात निलगिरीचे ड्रॉप टाका.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. आरोग्याच्या या माहितीचा आम्ही कुठलाही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अपहरण करून शेतात फरपटत नेलं, अत्याचारानंतर मुलीला तडफडवलं; ८ वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

माझी बायको घर सोडून गेली, मी जिवंत राहणार नाही; पाण्याच्या टाकीवर चढून नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये 'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील 'या' सदस्याची एन्ट्री, कोण आहे ती?

Gk : मोठ्या प्राण्यांचे तोंड लांब का असते? कारण वाचून तुम्ही ही पडाल विचारात

SCROLL FOR NEXT