Surabhi Jayashree Jagdish
एटीएम किंवा डेबिट-क्रेडिट कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तर अनेकांना बँकेच्या खात्यातील पैसे रिकामी होण्याची भीती असते. मात्र घाबरण्याची गरज नाही. काही सोप्या आणि योग्य पावलं उचलली तर तुमच्या खात्यातील पैसे सुरक्षित ठेवता येतात.
पहिल्यांदा तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर संपर्क साधा. त्यांना कार्ड हरवल्याची माहिती देऊन त्वरित डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ब्लॉक करून घ्या. असं केल्याने त्या कार्डचा कुणीही गैरवापर करू शकत नाही.
कार्ड ब्लॉक केल्यानंतर पुढील पाऊल म्हणजे नवीन कार्डसाठी अर्ज करणं. त्यासाठी जवळच्या बँक शाखेत जाऊन अर्ज करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला पुन्हा सुरक्षितपणे एटीएम सेवा वापरता येते.
कार्ड ब्लॉक झाल्यानंतर बँक तुमच्या नोंदणी केलेल्या पत्त्यावर नवीन कार्ड पाठवते. हे कार्ड आणि त्याचा पिन साधारणपणे ५ ते ७ कामकाजाच्या दिवसांत मिळतो. त्यामुळे ग्राहकांना फार काळ वाट पाहावी लागत नाही.
काही बँकांमध्ये थेट ब्रँचमधून जाऊन लगेच नवीन कार्ड मिळण्याची सुविधा असते. यासाठी तुम्हाला ओळखपत्र दाखवावं लागतं. आवश्यक पडताळणी झाल्यानंतर बँक कर्मचारी तुम्हाला लगेच नवीन कार्ड देऊ शकतात.
जर तुम्ही नेटबँकिंग सेवा वापरत असाल तर लगेच तुमच्या खात्याचा पासवर्ड बदलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित राहतात. फसवणूक टाळण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरतो.
एटीएममधून पैसे काढल्यानंतर नेहमी कॅन्सल बटण दाबण्याची सवय ठेवा. यामुळे तुमचं एटीएम सेशन बंद होतं. त्यामुळे पुढील व्यक्तीला तुमच्या व्यवहाराचा गैरफायदा घेता येत नाही.