Childhood Asthma : सततच्या सर्दी-खोकल्यामुळे पुणेकर त्रस्त, १० पैकी ४ चिमुकल्यांना होतोय बालदमाचा त्रास

Child CareTips : तापमानात होणाऱ्या कोणत्याही बदलाचा थेट परिणाम लहान मुलांच्या श्वसनव्यवस्थेवर होतो. त्यामुळे सध्या झपाट्याने बदलणारे हवामान आणि पहाटे पडणारे धुके यामुळे लहान मुलांमध्ये खोकला आणि दमा यासारखे आजार वाढल्याचे दिसून येत आहे.
Childhood Asthma
Childhood AsthmaSaam Tv
Published On

Pune News :

अवकाळी पडलेला पाऊस, त्यानंतर जाणवणारी थंडी आणि पहाटे शहरावर पसरणारे धुके अशा संमिश्र वातावरणामुळे श्वसनविकार झपाट्याने वाढत असल्याचे माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.

तापमानात होणाऱ्या कोणत्याही बदलाचा थेट परिणाम लहान मुलांच्या श्वसनव्यवस्थेवर होतो. त्यामुळे सध्या झपाट्याने बदलणारे हवामान आणि पहाटे पडणारे धुके यामुळे लहान मुलांमध्ये खोकला आणि दमा यासारखे आजार (Disease) वाढल्याचे दिसून येत आहे. पुण्यात दररोज ओपीडीमध्ये येणाऱ्या १० रुग्णांपैकी ४ रुग्णांमध्ये बालदम्याचे निदान होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.

हिवाळा (Winter Season) हा श्वसन विकाराच्या समस्यांना आमंत्रण देतो तर या दिवसात ऍलर्जीची लक्षणे देखील अधिक तीव्र होतात तसेच श्वासोच्छवासाच्या समस्यांमध्येही वाढ होते. या समस्या विशेषतः बालदमा असलेल्या मुलांमध्ये अधिक दिसून येतात. श्वसनलिकेवर सूज आल्यामुळे अथवा श्‍वासनलिकेमध्ये एक चिकट पदार्थ जास्त प्रमाणात स्रवण झाल्यामुळे श्‍वासनलिकेचा मार्ग अरुंद होऊन श्वासोच्छ्वास प्रक्रियेत अडचणी येतात.

Childhood Asthma
Study Tips: SSC, HSC च्या विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही; या १० टिप्स फॉलो करा

मुलांकडून श्वास बाहेर टाकताना छातीतून सततचा शिट्टीसारखा येणारा आवाज येत असल्यास त्याला बाल दमा असण्याची शक्यता सर्वाधिक असते. प्रदुषित वातावरण तसेच गर्दीच्या ठिकाई मुलांना मास्कचा वापर करावा.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील इंटरर्नल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. सम्राट शहा म्हणाले की, पुण्यातील बदलते वातावरण, वाढते प्रदुषण (Pollution), श्वसन संसर्गाचे वाढते प्रमाण ही या समस्येमागची तीन प्रमुख कारणे आहेत. पालकांनी विशेष खबरदारी बाळगणे गरजेचे असून मुलांना घशासंबंधी विकार आढळताच मुलांना मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यास सांगवे तसेच ऱ्हदयाच्या आरोग्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मैदानी खेळ खेळू देणे आणि सकस आणि ताजा आहार द्यावा. गेल्या काही दिवसांपासून व्हायरल ब्रोंकायटीसचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे देखील १५-२० दिवस खोकला बरा होत नसल्याच्या तक्रारींने बालरुग्ण ओपीडीमध्ये दाखल होत आहेत.

Childhood Asthma
Hungry Issue : तुम्हालाही सतत भूक लागते? दुर्लक्ष करु नकाच! असू शकतात या ५ गंभीर समस्या

अंकुरा हॉस्पिटल फॉर वूमन अँड चिल्ड्रेन येथील कन्सल्टंट पेडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट (आयसीयू विभागातील तज्ज्ञ) डॉ विश्रृत जोशी म्हणाले की, सकाळच्या थंड वातावरणात ज्यावेळी धुक्याचे प्रमाण अधिक असते अशावेळी व्यायाम करणे टाळा. घराबाहेर पडताना उबदार कपडे घालायला विसरु नका. रुम हिटर वापरण्यापुर्वी ते स्वच्छ करावे कारण वर्षभर न वापरल्यामुळे यामध्ये धूळ आणि बुरशीजन्य संसर्ग आढळून येऊ शकतो. म्हणून ते वापरण्यापूर्वी साफसफाई आणि फिल्टर बदलणे गरजेचे आहे. तसेच कोरड्या हवेचा त्रास टाळण्यासाठी, ह्युमिडिफायरचा वापर करा. धूराशी संपर्क टाळा, घराची व आजूबाजूच्या परिसराची नियमित साफसफाई करा आणि बेड तसेच पडदे गरम पाण्याने धुवा जेणेकरूम संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल.

अस्थमाच्या लक्षणांच्या सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांइतकेच निरोगी आहार आणि पुरेसे हायड्रेशन महत्वाचे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या बालरोगतज्ञांशी नियमित संपर्कात रहा असे डॉ जोशी यांनी स्पष्ट केले. पालकांनी आपल्या मुलांची योग्य काळजी घ्यावी आणि मुलांसोबत प्रवास करण्याचा विचार असेल तर जवळच्या वैद्यकीय सुविधांबाबत जागरूक रहावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com