Hungry Issue : तुम्हालाही सतत भूक लागते? दुर्लक्ष करु नकाच! असू शकतात या ५ गंभीर समस्या

Why You Are Always Hungry : काही खाल्ल्यानंतर तुम्हाला पुन्हा भूक लागते का? तुम्ही सतत काही खायला शोधता का? काहीच मिळाले नाही तर तुमची चिडचिड होते का?
Hungry Issue
Hungry IssueSaam Tv
Published On

Hunger Issue Reason :

हिवाळा म्हटलं की, या काळात आपल्याला अधिक भूक लागते. त्यामुळे आपण सतत खात राहातो. वाढत्या वयात लागणाऱ्या भुकेला आपण बरेचदा दुर्लक्ष देखील करतो. परंतु, जर तुम्हाला प्रत्येक ऋतूत सतत भूक लागत असेल. तर याकडे दुर्लक्ष करु नका.

काही खाल्ल्यानंतर तुम्हाला पुन्हा भूक लागते का? तुम्ही सतत काही खायला शोधता का? काहीच मिळाले नाही तर तुमची चिडचिड होते का? असे जर होत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करु नका. या सवयीमुळे गंभीर आजार (Disease) होण्याची शक्यता निर्माण होते. जाणून घेऊया याची कारणे.

1. हायपोग्लाइसेमिया

या समस्येमध्ये शरीरातील रक्तातील साखरेची (Sugar) पातळी कमी होऊ लागते. ज्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागते. त्यामुळे या समस्येला हलके घेऊ नका.

2. शरीरात पाण्याची कमतरता

शरीरात पाण्याची कमतरता झाल्यावर आरोग्यावर (Health) परिणाम होतो. यामुळे पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवताच त्याशिवाय त्वचा आणि केसांवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे वारंवार भूक लागते. हिवाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होते.

Hungry Issue
Sleep Debt : अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम, वेळीच घ्या काळजी; अन्यथा...

3. प्रथिनांची कमतरता

अन्नामध्ये पुरेशा प्रमाणात प्रथिने नसल्यामुळे व्यक्तीला वारंवार भूक लागते. प्रथिने ते हार्मोन्स तयार करण्यात मदत करतात. ज्यामुळे पोट भरलेले राहाते. शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळाले नाही तर वारंवार भूक लागते.

4. हायपोथायरॉईडीझम

हायपरथायरॉईडीझमची समस्या शरीरात थायरॉईड हार्मोनची पातळी वाढल्यावर उद्भवते. त्यामुळे वारंवार भूक लागते.

Hungry Issue
Ways To Reach Ayodhya : रामलल्लाचे दर्शन घ्यायला अयोध्येला जाताय? कमी वेळात पोहचण्यासाठी हे आहेत सोपे मार्ग

5. कॅलरी

वजन कमी करण्यासाठी आहारात कमी-कॅलरीचा समावेश करतात. त्यासाठी अधिक कॅलरी मिळतील असे पदार्थ खाणे गरजेचे आहे. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी कॅलरीजची गरज असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com